IAS S Siddharth : नितीश कुमारांनी डोक्यावर फुलदानी ठेवलेले एस. सिद्धार्थ आहेत तरी कोण?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि १९९१ बॅचचे आयएएस अधिकारी एस. सिद्धार्थ यांनी स्वागत केले आणि त्यांना फुलदाणी भेट दिली होती.
त्यानंतर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ताबडतोब एस. सिद्धार्थ यांच्या डोक्यावर ही फुलदाणी ठेवली होती.

एस. सिद्धार्थ यांनी आयआयटी, आयआयएममधून शिक्षण घेतले आहे

डॉ. एस. सिद्धार्थ हे १९९१ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत

त्यांनी आयआयटी दिल्लीमधून माहिती तंत्रज्ञानात पीएचडी केली आहे.
यासोबतच त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीएची पदवी देखील मिळवली आहे.

यासोबतच ते सध्या बनारस हिंदू विद्यापीठातून अर्थशास्त्रात दुसरी पीएचडी करत आहेत.
सध्या ते बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत.

आयएएस एस. सिद्धार्थ हे चर्चेत राहिलेले अधिकारी आहेत.

Elon Musk X Money Next : PhonePe, Google Pay ला टक्कर देणार इलॉन मस्कचे 'X Money'; फक्त एका क्लिकमध्ये पैसे ट्रान्सफर