बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहे. सध्या तिचा 'कान्स' लूक खूपच चर्चेत आहे. तिच्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे. आता लवकरच जान्हवी कपूर नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत बॉलिवूडचा हँडसम हंक हिरो पाहायला मिळणार आहे.
जान्हवी कपूरआता राज मेहता दिग्दर्शित 'लग जा गले' या चित्रपटात झळकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'लग जा गले' हा चित्रपट ॲक्शन लव्हस्टोरी आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत बॉलिवूडचा अभिनेता ( Tiger Shroff ) झळकणार आहे. पहिल्यांदाच जान्हवी कपूर आणि टायगर श्रॉफ ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'लग जा गले' ( Lag Ja gale) हा चित्रपट 2026 च्या अखेरपर्यंत थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो. लवकरच 'परमसुंदरी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एन्ट्री घेतली. जान्हवी कपूरने 'कान्स 2025' साठी बेबी पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता. मोत्यांचे दागिने, केसांचा बन आणि ग्लॉसी मेकअपने जान्हवीचे सौंदर्य खुललं आहे. जान्हवी कपूरचा हा लूक पाहून अभिनेत्री श्रीदेवी आणि त्यांच्या काळाची आठवण झाली आहे. जान्हवी कपूरचा रॉयल ड्रेस कस्टम-मेड स्कर्ट आणि कॉर्सेटचा आहे. जान्हवी कपूरच्या 'कान्स 2025'मधील 'महाराणी' लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.