उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका ४५ वर्षीय पुरूषाने त्याच्या ६५ वर्षीय प्रेयसीचा गळा दाबून खून केला. कारण प्रेयसीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. हे प्रकरण सराई अकिल पोलीस स्टेशन परिसरातील बराई गावचे आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, २५ मे रोजी ६५ वर्षीय सावरी देवी तिच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या गळ्यात कापडाचा तुकडा बांधला होता आणि त्यांचे कपडे विस्कटलेले होते. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी मंगळवारी बसुहार वळणाजवळ त्याच गावातील दिनेश कुमार सेनला अटक केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह म्हणाले की, चौकशीदरम्यान दिनेशने आपला गुन्हा कबूल केला आहे.
त्यांनी सांगितले की, सावरी देवी यांना मुले नव्हती. लग्नाच्या अवघ्या ६-७ वर्षांनी तिचा नवरा तिला सोडून गेला. ती तिच्या सासरच्या घरात एका वेगळ्या मातीच्या घरात एकटीच राहत होती. दिनेश त्यांना दूध आणि इतर आवश्यक वस्तू पुरवत असे. कालांतराने दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक निर्माण झाले. दिनेशने पोलिसांना सांगितले की, मी आणि सावरी देवी अनेकदा रात्री फोनवर बोलत होतो. कधीकधी मी रात्री उशिरा तिच्या घरीही जायचो.
तिच्याशी फोनवर बोलल्यानंतर, २३ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास, तो तिच्या घरी गेला. तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. पण सावरी देवी यांनी तब्येत बिघडल्याचे कारण देत नकार दिला. मला वाटलं ती काहीतरी निमित्त काढत आहे. आरोपी दिनेश म्हणाला की, मला त्या दिवशी तिच्यासोबत संबंध ठेवायचे होते. तिने नकार देऊनही मी तिच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली. तिने मला दूर ढकलले.
रागाच्या भरात मी कापडाच्या तुकड्याने तिचा गळा दाबून खून केला. तिथे अटकेच्या भीतीने दिनेशने तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि घराजवळील नाल्यात फेकून दिला. त्याच्या कबुलीच्या आधारे, पोलिसांनी सावरी देवीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. पोलिसांनी सांगितले की, कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दिनेशला न्यायालयात हजर करण्यात आले आणि नंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.