Sakal Vastu Property Expo : घर खरेदीचा निर्णय होणार सुलभ; 'सकाळ वास्तू एक्स्पो'ला बाणेरमध्ये उद्यापासून प्रारंभ
esakal May 30, 2025 06:45 AM

पुणे - मनासारखे घर घेण्याची संधी नागरिकांना एकाच ठिकाणी म्हणजे बाणेरमधील ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये मिळणार आहे. शनिवारी (ता. ३१) एक्स्पोला प्रारंभ होणार आहे. यामध्ये शहराच्या विविध भागांतील विविध प्रकारच्या बांधकाम प्रकल्पांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. नागरिकांना घर घेणे सोपे व्हावे म्हणून एक्स्पो आयोजित केला आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजता एक्स्पोचे उद्घाटन होईल. बाणेर रस्त्यावरील भारत पेट्रोलियम पंपाजवळ माउली गार्डनमध्ये रविवारपर्यंत (ता. १) एक्स्पो सकाळी १० ते रात्री आठपर्यंत खुला असेल. गेल्या काही वर्षांत पुण्यातील बांधकाम क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे.

अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रकल्प सध्या पुण्यात सुरू आहेत. या सर्वांत शहराच्या पश्चिम बाजूला अनेकांची पसंती मिळत आहे. त्यानुसार बाणेर भागात एक्स्पोचे आयोजन केले आहे. त्यात १५ हून अधिक विकसकांचे ७५ पेक्षा जास्त प्रकल्प असतील.

त्यामुळे घर खरेदीचा निर्णय घेणे नागरिकांना सुखकर होईल. विशेष म्हणजे एक्स्पो संपूर्ण वातानुकूलित हॉलमध्ये होणार आहे. त्यात फ्लॅट, बंगलो, रोहाउस, रीडेव्हलपमेंट प्रकल्पातील आरामदायी सदनिकांसह एन. ए. प्लॉटचे विविध पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.

कोणत्याही व्यवसायात विश्वास महत्त्वाचा असतो. ‘सकाळ’वर असलेल्या विश्वासामुळेच लोक एक्स्पोत येतील. विकसकांवर असलेल्या विश्वासामुळे ते घर घेतील. विश्वासाच्या याच नात्यावर आम्ही आमचे प्रकल्प एक्स्पोत मांडले आहेत. या एक्स्पोमुळे सर्वोत्तम रिअल इस्टेट प्रकल्प आणि खरेदीदार एकाच छताखाली येतात, जे दोघांसाठीही फायदेशीर आहे.

- पराग मेहता, सीओओ अँड एक्झिक्युशन डायरेक्टर, सेलमॅक्स प्लस (व्ही २१ ग्रुप ऑफ व्हेन्चुअर्स)

प्रदर्शनाविषयी

  • कधी : शनिवार (ता. ३१) व रविवार (ता. १)

  • कोठे : माउली गार्डन, बाणेर रस्ता, भारत पेट्रोलियम पंपाजवळ, बाणेर (वातानुकूलित हॉल)

  • वेळ : सकाळी १० ते रात्री ८

प्रवेश व पार्किंग विनामूल्य

अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६४६७२४३१

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.