आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 मे 2025
esakal May 30, 2025 03:45 PM
पंचांग

३० मे २०२५ साठी

शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ५.४२, सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय सकाळी ८.३६, चंद्रास्त रात्री १०.४३, विनायक चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ ९ शके १९४७.

दिनविशेष
  • २००४ : १९९९मध्ये ‘ऑपरेशन विजय’च्या काळात बटालिक क्षेत्रातील खालुबार हिल्स पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यातून परत मिळवताना वीरमरण आलेले कॅप्टन मनोजकुमार पांडे यांच्या तैलचित्राचे ‘एनडीए’मधील ‘माइक स्क्वॉड्रन’ येथील सभागृहात अनावरण.

  • २००५ : १९९५मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले कॅप्टन अरुणसिंग जसरोटिया यांच्या तैलचित्राचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील ‘एको स्क्वॉड्रन’मध्ये अनावरण.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.