Rohit Sharma Create History: रोहित शर्माने इतिहास रचला, IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; विराटच्या विक्रमाशीही बरोबरी
esakal May 31, 2025 03:45 AM

IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Marathi Update : रोहित शर्माने आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी दिलेल्या दोन जीवदानाचा फायदा उचलताना रोहितने आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम केला. याशिवाय त्याने विराट कोहलीच्या एका विक्रमाच्या पंक्तित मानाचं स्थानही पटकावले.

MI चा प्रथम फलंदाजीचा निर्णय योग्य ठरला. जॉनी बेअरस्टो व रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकांत ८४ धावा कुटल्या. रोहितला ४ व १२ धावांवर जीवदान मिळाले आणि त्याचा फायदा हिटमॅनने उचलला. आठव्या षटकात GT ला पहिले यश मिळाले. बेअरस्टोला २२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद होऊन माघारी जावे लागले. त्यानंतर रोहितने हात मोकळे करताना २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

रोहित आयपीएलच्या इतिहासात ३०० षटकार मारणारा पहिला भारतीय

सर्वाधिक आयपीएल षटकार

  • ३५७ – ख्रिस गेल (१४१ डाव)

  • ३००* – रोहित शर्मा (२६६ डाव)

  • २९१ – विराट कोहली (२५८ डाव)

  • २६४ – महेंद्रसिंग धोनी (२४२ डाव)

  • २५१ – एबी डिव्हिलियर्स (१७० डाव)

यष्टिरक्षक कुसल मेंडिसने आणखी एक झेल टाकला आणि यावेळी सूर्यकुमार यादवला जीवदान मिळाले.राशीद खानच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला, त्याने आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक ३२ षटकार खाल्ले आहेत. मोहम्मद सिराजविरुद्ध २०२२च्या पर्वात सर्वाधिक ३१ षटकार लगावले गेले होते. रोहित व सूर्या यांनी ३४ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी साई सुदर्शनने तोडली. सूर्या २० चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३३ धावांवर झेलबाद झाला. साईने त्याच्या ४ षटकांत ४२ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या.

दरम्यान रोहित शर्माने आणखी एक विक्रम नावावर केला आणि विराट कोहलीनंतर आयपीएलमध्ये ७००० हून अधिक धावा करतारा तो पहिला खेळाडू ठरला. विराटने ८६१८ धावा केल्या आहेत, तर रोहितच्या नावावर ७००३* धावा आहेत.

रोहित आयपीएलमध्ये ७,००० धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला.

सर्वाधिक आयपीएल धावा:

  • ८,६१८ – विराट कोहली (२५८ डाव)

  • ७,०००* – रोहित शर्मा (२६६ डाव)

  • ६,७६९ – शिखर धवन (२२१ डाव)

  • ६,५६५ – डेव्हिड वॉर्नर (१८४ डाव)

  • ५,५२८ – सुरेश रैना (२०० डाव)

  • ५,४३९ – महेंद्रसिंग धोनी (२४२ डाव)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.