बाल्कनी असावी आकर्षक
esakal May 31, 2025 11:45 AM

बाल्कनी ही घरातील एक छोटीशी विश्रांतीची जागा असते. चहाचे घेट तिथे तुम्ही आरामात बसू शकता, पुस्तकं वाचू शकता किंवा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. पण बाल्कनीत फक्त झाडांच्या कुंड्या ठेवून ती उत्तम दिसत नाही. इतर अनेक गोष्टी करून तिला आपली ‘कम्फर्ट स्पेस’ बनवता येईल. बाल्कनीचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं रूप आपल्याला सतत बदलता येतं आणि त्यात वेगवेगळे प्रयोग करता येतात. अगदी साध्या आणि स्वस्त पद्धतीनं बाल्कनीला सुंदर आणि आरामदायी कसं बनवायचं यासाठीच्या काही टिप्स बघूया-

बाल्कनीमध्ये हवी हिरवाई
  • बाल्कनीमध्ये हिरवाई हवीच. झाडांच्या कुंड्या ठेवण्यापासून लॉनसारखा अनुभव मिळण्यासाठी ‘ग्रीन मॅट्स’चा वापर करणं, अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता.

  • छोट्या कुंड्या : तुळस, पुदिना, गुलाब, जास्वंद, वेगवेगळी ‘ऑफिस प्लॅंट्स’ अशी छोटी झाडं असलेल्या कुंड्या तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता.

  • हँगिंग कुंड्या : भिंतीवर किंवा कुंपणावर फुलझाडांच्या कुंड्या अडकवता येतात. अशा हँगिंग कुंड्यांमुळे बाल्कनीला छान ‘लूक’ मिळतो.

  • व्हर्टिकल गार्डन : जागा कमी असल्यास भिंतीवर किंवा खास स्टँड तयार करून त्यात विशिष्ट पद्धतीनं झाडं लावून झाडांची उभी भिंत तयार करता येते. यात कल्पकपणे मांडणी करता येते.

आरामदायी फर्निचर
  • बाल्कनीत बसण्यासाठी योग्य व आरामदायक फर्निचरचा वापर करावा.

  • फोल्डिंगच्या खुर्च्या आणि टेबल : जागा कमी असल्यास मुडपता- म्हणजे ‘फोल्ड’ करता येणारं फर्निचर वापरा.

  • गाद्या, कुशन्स : जमिनीवर मऊ गाद्या किंवा कुशन्स ठेवा. या गाद्यांवर बेडशीट्स किंवा कुशनची कव्हर्स आकर्षक पद्धतीची हवीत.

  • हॅमॉक किंवा झोका : जागा असेल तर एक छोटा हॅमॉक (झोपून आराम करण्याचा झोका) वा साधा झोका लावून वेगळंच वातावरण तयार करता येतं.

प्रकाशाची जादू
  • रात्रीच्या वेळी बाल्कनी आकर्षक दिसावी, म्हणून विजेच्या दिव्यांची छान रचना करा.

  • फेअरी लाइट्स : हल्ली अशा प्रकारचे लाइट्स ऑनलाइन पद्धतीनं मागवता येतात. त्यांने वापर करून बाल्कनीचं रूप पूर्ण बदलून टाकता येतं.

  • लँटर्न/ डिओ लाइट्स : बाल्कनीच्या भिंतींवर सोलर लँटर्न लावता येतील. विशिष्ट प्रसंगांमध्ये छान मेणबत्त्यांचा वापर करता येईल.

  • एलईडी स्ट्रिप लाइट्स : रेलिंगवर किंवा छतावर रंगीत एलईडी लाइट्स लावता येईल.

रंग आणि पॅटर्न्सचा खेळ
  • बाल्कनीच्या रंगसंगतीकडे लक्ष द्या. घरातल्या इतर खोल्यांपेक्षा बाल्कनीला वेगळा रंग किंवा पॅटर्नचा वापर करता येतो.

  • भिंतीचा रंग/ वॉल स्टिकर्स : भिंत असल्यास त्यावर मनोरंजक पॅटर्न तयार करता येईल, वॉल स्टिकर्स लावता येतील. वारली पेंटिंग, निसर्गचित्र काढता येईल.

  • पडदे : गडद रंगांच्या कुशन्स आणि हलक्या पडद्यांनी बाल्कनीला ‘पॉप लूक’ येतो.

छोट्या घटकांचा वापर
  • बाल्कनीत कलात्मक, छान वस्तू वापरून ती आणखी सजवता येईल.

  • ‘डीआयवाय’ वस्तू : जुन्या बाटल्या, बॉक्स वगैरे वापरून फुलदाण्यांसारख्या वस्तू, कागदी वस्तू करा. एखादा ‘क्रिएटिव्ह कॉर्नर’ तयार करा.

  • विंड चाइम्स : हवेच्या झुळकेने मधुर आवाज करणाऱ्या ‘विंड चाइम्स’चा वापर करता येईल.

  • छोटे कारंजे : शक्य असेल, तर एखादं छोटं कारंजं बाल्कनीत ठेवता येईल.

  • सर्जनशीलता बाळगून कमी बजेटमध्ये बाल्कनी आकर्षक आणि आनंददायी करता येईल.

गंमत किचन

स्वयंपाकघर म्हणजे एक प्रयोगशाळाच. अनेक पदार्थ तयार होत असताना गमतीदार प्रसंगही घडत असतात. कधी एखादा पदार्थ बिघडून नवाच पदार्थ तयार होतो, तर कधी कुणाच्या तरी सूचनेमुळे मजेशीर वातावरण तयार होतं. असे प्रसंग आठवून आपण अनेकदा हसत असतो. तुमच्याही स्वयंपाकघरात असा प्रसंग घडलाय का? तर मग आम्हाला तो नक्की लिहून पाठवा. शब्दमर्यादा साधारण चारशे शब्द.

लेख पाठवण्याचा पत्ता : maitrin@esakal.com

हातखंडा पदार्थ

तुमचे काही खास, हातखंडा पदार्थ असतील ना? अशा हातखंडा पदार्थांबरोबर काढलेला तुमचा फोटो किंवा सेल्फी नक्की पाठवा. त्याच्याबरोबर तुमचं नाव देवनागरीत लिहून पाठवा.

फोटो, सेल्फी पाठवण्याचा पत्ता : maitrin@esakal.com

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.