‘गुलमोहर’प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
धुळे, ता. ३० : येथील वादग्रस्त गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या बेहिशोबी एक कोटी ८४ लाख ८४ हजार रोकड प्रकरणात येथील शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३०) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये मंत्रालयातील निलंबीत कक्ष अधिकारी तथा विधिमंडळ अंदाज समितीचा स्वीय सहाय्यक किशोर पाटील, राजू मोगरे आणि अन्य एक अशा तिघा संशयिताविरुद्ध कलम १२४ महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.