संतुलित आणि पोषक आहारासोबत निरोगी पोटासाठी अन्नपचन सुरळीत होणं आवश्यक आहे. तुम्ही विविध पोषकतत्वे असलेले अनपदार्थ खात असाल पण, पदार्थांचे व्यवस्थित पचन होत नसेल तर शरीराला पोषकतत्वे मिळत नाहीत. याशिवाय गॅस, अपचन, आंबट ढेकर, पोटफुगी अशा समस्या सुरु होतात. पोटाच्या तक्रारी सुरु झाल्या की, संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत पोटाच्या विविध तक्रारींपासून आराम मिळण्यासाठी आयुर्वेदिक उपाय करणे फायद्याचे ठरेल. आयुर्वेदातील उपायांपासून आराम मिळण्यासाठी वेळ लागत असला तरी त्याचे परिणाम हे दिर्घकाळ असतात. त्यामुळे आयुर्वेदीक उपाय केव्हाही उत्तम मानले जाते. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात पोट निरोगी ठेवण्यासाठी कोणते आयुर्वेदिक उपाय करता येतील.
ओव्यामध्ये थायमॉल नावाचे कंपाऊंड असते, जे पाचक एन्झाइम्सचा स्त्राव वाढवते आणि गॅस कमी करतो.
या उपायाने पोटदुखी, गॅस, अपचन यापासून आराम मिळेल.
पोटात गॅस झाल्यावर हिंग रामबाण उपाय आहे. हिंगातील गुणधर्म पोटातील गॅस बाहेर काढण्यास फायदेशीर असतात.
कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळा आणि ते प्या.
पोटातील वायू निर्माण होण्यापासून रोखले जाते.
पुदिन्याची पाने पोटाच्या स्नायूंना आराम देते, ज्यामुळे पोटदुखी आणि पेटके कमी होतात. मळमळीचा त्रास असेल पुदिन्याने आराम मिळेल.
ताजी पुदिन्याची पाने खाऊ शकता. याशिवाय पुदिन्याच्या पानांचा चहा किंवा काढा करून सेवन करता येईल.
ताकात प्रोबायोटिक्स असतात, जे निरोगी आतड्यांतील बॅक्टेरियांना प्रोत्साहन देतात, ज्यामुळे पचन सुरळीत होते.
एक ग्लास ताकात थोडे भाजलेले जिरे आणि काळे मीठ मिसळा आणि दुपारी जेवणानंतर प्या.
लिंबू पचनक्रिया उत्तेजित करते आणि मध पोटाला शांत करते. हे मिश्रण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी देखील मदत करते.
एक ग्लास कोमट पाण्यात एख चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करा आणि ते प्या.
बडीशेप पोटाच्या आरोग्यासाठी वरदान मानली जाते. त्यामुळे पोट फुगणे, गॅस अशा समस्या असतील तर बडीशेप अवश्य खावी.
जेवणानंतर एक चमचा बडीशेप चावून खावी. तुम्ही बडीशेपचा चहा देखील पिऊ शकता.
हेही पाहा –