कॉमेडी क्वीन शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. तिला सर्वजण कल्याणच्या चुलबुली या नावाने ओळखतात. तिने आपल्या कॉमेडीने जगाला हसवले आहे. शिवालीने आपल्या अभिनयाचे चाहत्यांना वेड लावले आहे. शिवाली परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या विविध लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते. चाहते देखील शिवालीला भरभरून प्रेम करतात.
मराठी अभिनेत्री परबने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक डान्स रील शेअर केली आहे. तिने 'रूखी सूखी रोटी' या गाण्यावर शेतात भन्नाट डान्स केला आहे. डान्समधील तिच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. ती शेतात एका झाडाखाली डान्स करताना दिसत आहे. 'रूखी सूखी रोटी' हे गाणे 2001 साली रिलीज झालेल्या 'नायक' चित्रपटातील आहे. या गाण्यात बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री मुखर्जी झळकले आहेत.
शिवालीचा लूकडान्ससाठी शिवालीने छान पारंपरिक लूक केला आहे. तिने सुंदर घागरा चोळी परिधान केली आहे. केशरी रंगाचा ब्लाउज आणि जांभळ्या रंगाचा घागरा तिने घातला आहे. मोकळे केस, मिनिमल , मोत्याचे दागिने, हातात बांगड्या घालून तिने हा लूक पू्र्ण केला आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूपच सुंदर दिसत आहेत.
शिवाली परबच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंटमध्ये तिला नेटकरी क्यूट, ब्युटीफूल, मस्तच अशा कमेंट मिळत आहेत. शिवालीने या डान्स व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "धडक धडक मेरा दिल डोला..."