भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टाइल्स उत्पादक कंपनी ठरली 'ही' कंपनी; १४०० कोटींची केली गुंतवणूक
मुंबई : बांधकाम साहित्य पुरवणारी Infra.Market या आघाडीच्या कंपनीने टाइल्स उत्पादन क्षेत्रात मोठा टप्पा पार करत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळख मिळवली आहे. कंपनीकडे सध्या १९ उत्पादन केंद्रे असून एकूण उत्पादन क्षमता ८१.५७ दशलक्ष चौरस मीटर इतकी आहे. या कामगिरीसाठी कंपनीने १४०० कोटी गुंतवले आहेत.
पाचपट वाढ आणि आंतरराष्ट्रीय विस्तारगेल्या ३ ते ४ वर्षांत कंपनीने ५ पट वाढ साधली आहे. देशांतर्गत व्याप्ती आणि निर्यातीतील यशामुळे Infra.Market च्या उत्पन्नात २५% ते ३०% पर्यंत निर्यातीचा वाटा आहे. कंपनीचे सह-संस्थापक आदित्य शारदा यांनी सांगितले की, "भारत आता टाइल्सच्या बाबतीत जागतिक उत्पादन केंद्र बनला आहे."
मल्टी-ब्रँड पोर्टफोलिओ आणि सेवा क्षेत्र
Infra.Market च्या टाइल्स विभागात ३ प्रमुख ब्रँड्स आहेत –
एमसर: प्रीमियम ग्राहकांसाठी
आयव्हीएएस: मास-प्रीमियम क्षेत्रासाठी
खासगी लेबल्स: विविध प्रकल्पांसाठी
हे ब्रँड्स व्यावसायिक प्रकल्प, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, OEM कंपन्या, आर्किटेक्ट्स आणि शहरी व ग्रामीण कंत्राटदारांची गरज पूर्ण करतात.
डिजिटल वितरण आणि विक्री नेटवर्क
Infra.Market कडे देशभरात १२,००० पेक्षा जास्त वितरकांचे नेटवर्क आहे. प्रकल्पांची गरज ओळखून उत्पादन, वितरण आणि लॉजिस्टिक्स यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनी अधिक प्रभावी सेवा देते.
भविष्यातील बाजार आणि वाढीचा वेग
भारताची सिरॅमिक टाइल्स बाजारपेठ सध्या ५९,५०० कोटी इतकी असून, २०२५ अखेरपर्यंत ती ७०,७०० कोटी होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट, प्रीमियम फिनिश टाइल्स आणि पुनर्विकास प्रकल्पांमुळे या क्षेत्राला वेग येत आहे.
कंपनीचा संक्षिप्त परिचय
Infra.Market ची स्थापना २०१६ मध्ये झाली. त्यांनी RDC काँक्रीट, शालिमार पेंट्स, एमसर, मिलेनियम टाइल्स यामध्ये धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. कंपनीकडे १०,००० रिटेल टचपॉइंट्स, ३० फ्लॅगशिप दालने आणि २५० पेक्षा जास्त उत्पादन केंद्रे आहेत.