बुलडाणा : मोताळा तालुक्यातील निमखेड येथील सुपुत्र पार्थ मोतीराज चव्हाण यांची सब लेफ्टनंट म्हणून भारतीय नौदला मध्ये निवड झाली आहे. पार्थ चव्हाण हे मूळचे निमखेड (कोथळी) येथील राहणारे असून त्यांचे वडील प्रा. मोतीराज चव्हाण हे नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
पार्थ चव्हाण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपूर व अभियांत्रिकी चे शिक्षण हे पुणे येथील व्ही आय आय टी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झाले आहे. पार्थ चव्हाण यास सुरवातीपासून अभ्यासाची गोडी होती.
ते हेरून वडिलांनी त्याला स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांनी अभियांत्रिकी चा अभ्यास सुरू असतांनाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला ''अभियांत्रिकी चे शेवटच्या वर्षाला असतांना च त्यांनी युपीएससी सीडीएसची परीक्षा दिली होती.
त्यात पहिल्याच प्रयत्नात त्यांनी लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. पहिल्या एसएसबी मुलाखतीत कॉन्फरन्स आऊट झाला होता. त्यानंतर एफकॅट ची परीक्षा व एसएसबी मुलाखत तो उत्तीर्ण झाला. त्यात त्याची ७९ रँक आली होती. परंतु मेडिकल अनफिट झाला (फ्लाईंग ब्रँच मध्ये ) परंतु जिद्द कायम असल्यामुळे २२ व्या वर्षी त्याची भारतीय नौदलामध्ये सब लेफ्टनंट म्हणून त्याची निवड झाली आहे.
त्यात त्याला जनरल सर्व्हिस एकझुकेटिव्ह ही ब्रँच मिळाली आहे. पार्थ चव्हाण यांची भारतीय नौदलामध्ये निवड झाल्याने त्यांचे कुटुंब गावकरी,यांनी त्याचे अभिनंदन केले असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आजी आजोबा रामदास चव्हाण, मोठे वडील उत्तमराव चव्हाण आजोबा ( नानाजी) रतन पवार'' .आई पद्मा चव्हाण व वडील डॉ. मोतीराज चव्हाण यांना दिले आहे.