MI vs PBKS: क्वालिफायर-2 सामना पावसाने रद्द झाल्यास 'हा' संघ पोहोचणार थेट फायनलमध्ये
Marathi June 01, 2025 07:25 AM

एमआय वि पीबीक्स क्वालिफायर 2: मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला धूळ चारत क्वालिफायर-2 मध्ये (Qualifier 2) आपले स्थान निश्चित केले आहे. तर, पंजाब किंग्जचा संघ क्वालिफायर-1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून (RCB) हरल्यानंतर आधीच क्वालिफायर-2 मध्ये पोहोचला आहे. आता पंजाब आणि मुंबई यांच्यात क्वालिफायर-2 मध्ये जो संघ हा सामना जिंकेल, तो आरसीबीसोबत आयपीएल 2025चा फायनल सामना खेळेल. (IPL 2025 Final)

यंदाच्या आयपीएल हंगामाचा क्वालिफायर-2 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला जाईल. या सामन्यात पावसाची शक्यता खूपच कमी आहे. परंतु, जर मुंबई आणि पंजाब यांच्यातील हा क्वालिफायर-2 सामना पावसामुळे रद्द झाला, तर आयपीएलच्या नियमांनुसार, लीग सामन्यांमध्ये गुणतालिकेत जो संघ पुढे होता, तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. (IPL Points Table)

विचार केला तर, पंजाबचा संघ 19 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी होता, तर मुंबईचा संघ 16 गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता. अशा परिस्थितीत, जर सामना पावसामुळे रद्द झाला, तर पंजाबचा संघ सामना न खेळताच फायनलमध्ये पोहोचेल.

मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात जर पावसाने काही काळासाठी अडथळा आणला, तर प्लेऑफ सामन्यांसाठी आयपीएलमध्ये काही अतिरिक्त वेळ दिला जातो. जर क्वालिफायर-2 उशिरा सुरू झाला तरी, सामना पूर्ण करण्यासाठी 126 मिनिटे म्हणजेच 2 तासांचा अतिरिक्त वेळ मिळू शकतो. परंतु, जर सामना पूर्णपणे पावसामुळे रद्द झाला, तर कोणताही राखीव दिवस (Reserve Day) उपलब्ध नाही.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज संघातील क्वालिफायर-2 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (1 जून) रोजी संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. यानंतर (3 जून) रोजी आयपीएलचा फायनल सामना देखील याच स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलचा फायनल सामना आधी कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये ठेवण्यात आला होता, परंतु भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे तो अहमदाबादला हलवण्यात आला आहे. (IPL 2025 Final Match)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.