Monsoon Tips : पावसाळ्यात लाकडी दार फुगल्यास वापरा या ट्रिक्स
Marathi June 01, 2025 06:28 PM

एकीकडे पाऊस आपल्यासोबत प्रसन्न वातावरण आणि आनंद घेऊन येतो मात्र त्याचसोबतच अनेक समस्याही घेऊन येतो. पावसातील ओलाव्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपैकी एक म्हणजे लाकडी दारे आणि खिडक्या फुगणे. पाऊस पडताच, ओलाव्यामुळे लाकूड फुगते, ज्यामुळे दरवाजे आणि खिडक्या बंद करणे किंवा उघडणे कठीण होते. खरं तर, लाकूड खूप लवकर ओलावा शोषून घेते. त्याच वेळी, जेव्हा पावसामुळे हवामानातील आर्द्रता वाढते तेव्हा त्याचा परिणाम दारे आणि खिडक्यांवर दिसून येतो. दाराचे लाकूड दमट वातावरणात फुगते. मात्र हवामान बदलले की लाकूड पुन्हा त्याच्या मूळ स्थितीत येते.

जर पावसात लाकडी दरवाजा किंवा खिडकी सुजली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण, आज आपण काही अशा हॅक्स आणि ट्रिक्स जाणून घेऊयात ज्यांच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांच्या प्रयत्नात लाकडी दरवाजे आणि खिडक्या पुन्हा आहेत तशाच पूर्ववत करू शकता.

पेट्रोलियम जेली आणि मेण

पावसाळ्यात दरवाजे आणि खिडक्यांचे लाकूड फुगू लागते, म्हणून ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही पेट्रोलियम जेली आणि मेणाची मदत घेऊ शकता. पेट्रोलियम जेली आणि मेणाच्या मदतीने दरवाजे आणि खिडक्यांच्या हालचालीतील घर्षण वाढवता येते. या ट्रिकसाठी प्रथम एका भांड्यात 2 ते 3 चमचे पेट्रोलियम जेली घ्या. आता एक मेणबत्ती हलकी गरम करा , ती वितळवा आणि पेट्रोलियम जेलीमध्ये चांगले मिसळा. पेट्रोलियम जेली आणि मेणाचे हे मिश्रण दरवाजाच्या कोपऱ्यांवर लावा. विशेषतः ज्या ठिकाणी दार उघडते आणि बंद होते अशा ठिकाणी हे लावा. हे मिश्रण दरवाजाची हालचाल सुलभ करू शकते, ज्यामुळे दार अडकण्यापासून वाचते.

ऑलिव्ह ऑइल

पावसाळ्यात लाकडी दारांना तेल लावणे देखील फायदेशीर ठरू शकते. ऑइलिंगमुळे, दरवाज्यांची हालचाल चांगली होते आणिॉ ते जास्त अडकत नाहीत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही यासाठी ऑलिव्ह ऑइल देखील वापरू शकता. जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल, तर तुम्ही दरवाजाच्या बिजागरांवर आणि उघडण्याच्या किंवा बंद होण्याच्या ठिकाणी मोहरीचे तेल देखील लावू शकता.

हेअर ड्रायर

पावसाळ्यात ओलावा असल्याने लाकूड फुगते. त्यामुळे दरवाजे आणि खिडक्या उघडण्यास व बंद करण्यास अडचण येते. लाकडातील ओलावा कमी करण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरची मदत देखील घेऊ शकता. यासाठी तुम्ही लाकडी दार किमान 10 ते 15 मिनिटे हेअर ड्रायर वापरून कोरडे करू शकता. हेअर ड्रायर वापरत असताना तो 30 सेंटीमीटर अंतरावर ठेवा. कारण, तो खूप जवळ ठेवल्याने लाकूड गरम होऊ शकते आणि जळू शकते.

लाकडी पोलिश

जर तुमचा लाकडी दरवाजा दर पावसाळ्यात फुगत असेल, तर त्याचे एकदा वुडन पॉलिशिंग करून घ्या . जरी, ही पद्धत थोडी महाग असली तरी यामुळे तुमची समस्या लगेच सुटू शकते.

हेही वाचा : Kitchen Tips : खाण्याव्यतिरिक्त घरगुती कामांमध्येही उपयुक्त मीठ


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.