सध्या सोशल मीडियावर सर्वत्र नेपोटिझमची चर्चा पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण यावर आपले मत मांडताना दिसत आहेत. आता या मुद्द्यावर कॉमेडी किंग अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav ) याने देखील आपले मत मांडले आहे. तो नेमकं या बाबत काय म्हणाला, जाणून घेऊयात.
अलिकडेच झालेल्या मिडिया मुलाखतीत याने नेपोटिझमवर आपले मत मांडले. तो म्हणाला की, "प्रामाणिकपणे बोलायचे झाले तर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नाही. कारण नेपोटिझम असते. तर शाहरुख खान बॉलिवूडचा किंग कसा? राजपाल यादव, परेश रावल, अनुपम खेर सर, अक्षय कुमार सर, सर कसं असते. तसेच राजेश खन्ना आणि धर्मेंद्र सर बॉलिवूडमध्ये कसे असते?"
राजपाल यादव पुढे म्हणाला," मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी सिनेसृष्टीतील येण्यास सांगितले नाही. ही माझी इच्छा होती. मी माझ्या मुलांनाही सांगितले आहे की, कोणत्याही खेळ किंवा चित्रपटामुळे कोणाचे बनत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही या इंडस्ट्रीत काम करायला पुरेसे सक्षम असाल तरच तु्म्ही हे साध्य करू शकता. मी तुम्हाला पुढे जाण्यासाठी धक्का देऊ शकतो. पण पुढे तुम्हालाच त्याचा सामना करावा लागेल. माझे इंडस्ट्रीमध्ये २०० ओळखीचे लोक आहेत पण काहीही काम झाले नाही. "
शेवटी राजपाल यादव म्हणाला की, "मी 38 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. पण आजवर माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इंडस्ट्रीमध्ये संधी मिळू शकली नाही. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नाही.जर बॉलिवूडमध्ये काम मिळवायचे असेल तर प्रयत्न केले पाहिजे. "