RCB vs PBKS Final: यंदाच्या आयपीएल हंगामाचा फायनल सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. (RCB vs PBKS IPL Final 2025) 3 जून रोजी संध्याकाळी हे दोन्ही संघ आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने पहिल्यांदाच मैदानात उतरतील. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर फायनल सामना रंगणार आहे. पण चाहत्यांसाठी वाईट बातमी म्हणजे विजेतेपदाच्या सामन्यावर पावसाची सावली पडली आहे.
सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्व चाहत्यांच्या मनात हा प्रश्न आहे की जर पावसामुळे (3 जून) रोजी सामना झाला नाही तर कोणता संघ विजेता होईल. चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊयात. (Who will win if it rains in the final match between PBKS and RCB?)
आयपीएल 2025च्या फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजेच जर 3 जून रोजी पाऊस थांबला नाही तर फायनल सामना (4 जून) रोजी खेळवला जाईल. पण जर पावसामुळे राखीव दिवसही वाया गेला तर या परिस्थितीत दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित केले जाऊ शकते.
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत 36 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी 18-18 सामने जिंकले आहेत. आयपीएल 2025 मध्ये दोन्ही संघ तीन वेळा भिडले आहेत, त्यापैकी आरसीबीने 2 वेळा विजय मिळवला. गेल्या 6 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, पंजाबला त्यापैकी फक्त 1 विजय मिळवता आला आहे. (RCB vs PBKS Head To Head Records)