वट सावित्रीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पंचागानुसार, जेष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा वट पौर्णिमा 10 जून 2025 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी विवाहित महिला व्रत करून त्यांच्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतात. मान्यतेनुसार, जी विवाहिता हे व्रत पूर्ण करते तिला अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी वडाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी सावित्रीने तिचा पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते. त्यामुळे महिला सौभाग्य आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी वट पौर्णिमेला वडाची पूजा करतात. अशातच आज आपण देशातील सर्वात प्राचीन वडाच्या झाडांची माहिती घेणार आहोत. ही वडाची झाडे अनेक वर्षे प्राचीन असल्याने त्यांना धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रयाग –
उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे नदीच्या काठावर एक प्राचीन वटवृक्ष आहे. या झाडाला अक्षयवट असे देखील म्हटले जाते. येथे आसपास राहणारी मंडळी या वडाविषयी असं सांगतात की, या वडाचे दर्शन घेतल्यास सर्व पापे नष्ट होतात.
पश्चिम बंगाल –
पश्चिम बंगाल येथील जवळपास 250 वर्षे असलेले वडाचे झाड खूप प्रसिद्ध आहे. हे वडाचे झाड त्याच्या पसरलेल्या मुळांमुळे एखाद्या घनदाट जंगलासारखे दिसते. हे वडाचे झाड सुमारे 3.5 एकर जमिनीवर पसरलेले आहे.
मुनतावली –
नैनितालजवळ सुमारे 200 वर्षे जुने एक वडाचे झाड आहे. उत्तराखंडमध्ये नैनिताल हे ठिकाण आहे. नैनितालमध्ये फिरायला येणारे पर्यटक आवर्जून हे वडाचे झाड पाहतात. या वडाच्या झाडाला लांबच लांब पारंब्या आहेत.
आंध्र प्रदेश –
आंध्र प्रदेश राज्यातील वडाचे झाड 550 वर्षे प्राचीन असल्याचे बोलले जाते. जगातील सर्वात मोठ्या वडाच्या झाडांपैकी एक हे झाड आहे. हे वडाचे झाड सुमारे 5 एकरवर पसरलेले आहे.
गुजरात –
गुजरातमधील आनंद जिल्ह्यात हे 300 वर्षे प्राचीन वडाचे भव्य झाड आहे. जवळपास 300 वर्षे प्राचीन हे झाड असल्याने या वडाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वट सावित्रीच्या दिवशी अनेक महिला येथे पुजा करण्यासाठी जातात.
हेही पाहा –