पुणे : पहिल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’चा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना अजित पवार यांनी तुमची कॉपी केल्यामुळे आमचं सरकार आलं, अशी जाहीर कबुली शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर दिली. (Ajit Pawar publicly admitted to Shivraj Singh Chouhan that our government came to power because of copying the Ladki Bahin Yojana)
देशात पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना योजना सुरू केली. यांतर्गत महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा केले गेले. त्यामुळे मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर महिलांनी रेकॉर्ड ब्रेक मतदान करत भाजपाला विजयी केले. याचाच कित्ता महाराष्ट्र आणि झारखंडने गिरवला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमांतून महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होत होते. त्यामुळे ही योजना सुरू कायमस्वरुपी सुरू ठेवण्यासाठी महिला मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळे महायुतीला या गोष्टीचा मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर याचीच कबुली दिली आहे.
हेही वाचा – Politics : रुपाली चाकणकरांना पदावरून हटवण्याची मागणी; नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांनाच सुनावले
‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’चा समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचं जुनं नातं आहे. मध्य प्रदेशातून अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांचं काम सुरू केलं होतं. आज त्यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्त शुभेच्छा देतो. शिवराज सिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना मध्यप्रदेशात सुरू करून लोकांचं मन जिंकण्यासाठीच जिंकणारी योजना आणली आहे. महायुतीला विधानसभेत मोठं यश मिळण्यामागे लाडकी बहीण योजनेचा हात आहे. आम्हाला सत्तेत आणण्याचं काही प्रमाणात श्रेय तुम्हालाही (शिवराज सिंह चौहान) जातं, असे म्हणत अजित पवार यांनी जाहीर कबुली दिली.
हेही वाचा – Operation Sindoor : मोदींच्या नावाचं सिंदूर लावणार का? भगवंत मान यांच्या बेताल वक्तव्यावर भाजापाकडून संताप