या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बंगळुरुत बुधवारी 4 जूनला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरसीबीसह कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) आणि डीएनए या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरसीबी, डीएनए, केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या विजयी जल्लोषाच्या नियोजनात बेजबाबदारपणा बाळगल्याचा उल्लेख या एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.