Rohit Sharma: भारतीय संघ या महिन्यात इंग्लंडविरूद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. (India vs England Test Series) पण याआधीच रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी निवृत्तीची घोषणा केली. (Rohit Sharma Test Retirement) अशा परिस्थितीत, आता प्रश्न असा आहे की त्याच्या जागी भारतासाठी सलामीवीर फलंदाजाची भूमिका कोण बजावेल? रोहितच्या जागी 3 फलंदाज आहेत, जे त्याची जागा घेऊ शकतात.
यादीत पहिले नाव केएल राहुलचे (KL Rahul) आहे. त्याने अनेक वेळा भारतीय संघासाठी कसोटीत सलामीवीर फलंदाजाची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत तो एक प्रबळ दावेदार आहे. याशिवाय, अभिमन्यू ईश्वरनकडे रोहित शर्माच्या जागी पाहिले जात आहे. त्याच वेळी, आयपीएल 2035 मध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या साई सुदर्शनलाही सलामीवीर फलंदाज म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालबद्दल (Yashasvi Jaiswal) बोलायचे झाले तर, तो रोहित शर्मासोबत आधीच कसोटीत सलामीवीर होता. अशा परिस्थितीत, त्याचे स्थान निश्चित मानले जात आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ-
शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर, उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-
पहिली कसोटी 20 जून ते 24 जून हेडिंग्ले लीड्स
दुसरी कसोटी 2 जुलै ते 6 जुलै एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी 10 जुलै ते 14 जुलै लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी 23 जुलै ते 27 जुलै ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी 31 जुलै ते 4 ऑगस्ट द ओव्हर, लंडन