‘सुब्रतो फुटबॉल’ स्पर्धा रत्नागिरीत
विजय शिंदेः संकेतस्थळावर नोंदणी अनिवार्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीद्वारा २०२५-२६ या वर्षासाठी ६४वी आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल सबज्युनिअर व ज्युनिअर गटासाठीची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १५ वर्षांखालील मुले (सबज्युनियर) व १७ वर्षांखालील मुले व मुली (ज्युनिअर) या वयोगटात होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली आहे. जे संघ सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत त्यांनी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. याबाबत माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा.