IPL Final 2025 vs Royal Challengers Bengaluru Live Update: पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचं आज कौतुक करावं तेवढं कमीच आहे. विराट कोहलीसारखा आक्रमक फलंदाज मैदानावर उभा असतानाही त्यांनी RCB च्या धावा जखडून ठेवल्या. विराट पहिल्या षटकापासून ते १५ व्या षटकापर्यंत मैदानावर उभा राहिला, पंरतु त्याला केवळ ४३ धावा करू दिल्या. PBKS च्या गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि त्यांनी संथ चेंडू व बाऊन्सर अशी रणनीती आखली होती.
फिल सॉल्ट ( १६) दुसऱ्या षटकात कायल जेमिन्सनला विकेट देऊन माघारी परतला. मयांक अग्रवाल व यांनी संयमी खेळ दाखवताना २८ चेंडूत ३८ धावा जोडल्या होत्या आणि ही जोडी तोडण्यासाठी युझवेंद्र चहलला आणण्याचा डाव यशस्वी ठरला. मयांक १८ चेंडूंत २४ धावांवर झेलबाद झाला. पंजाबच्या गोलंदाजांनी विराटला शांत ठेवले होते आणि त्याला मोठे फटके मारू दिले नाही. १०व्या षटकात अझमतुल्लाह ओमारझाईच्या शॉर्ट चेंडूवर विराटने चुतराईने यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून अपर कट मारून चौकार मिळवला. बंगळुरूच्या १० षटकांत २ बाद ८७ धावा केल्या.
कर्णधार रजत पाटीदार चांगली फटकेबाजी करताना दिसला. पण, जेमिन्सनच्या संथगतीच्या यॉर्कवर पाटीदार फसला. १६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २६ धावांवर तो पायचीत झाला. विराटसह त्याने २७ चेंडूंत ४० धावा जोडल्या. लाएम लिव्हिंगस्टोनलाही मोठे फटके मारण्यापासून रोखले होते. विराट व लिव्हिंगस्टोनने हात मोकळे करण्यास सुरुवात केली आणि १४ व्या षटकात त्यांनी १४ धावा चोपल्या. युझीने ४ षटकांत ३७ धावा देत १ विकेट घेतली. पण, १५ व्या षटकात अझमतुल्लाह ओमारझाईने स्वतःच्याच गोलंदाजीवर विराटचा झेल पकडला. विराट ३५ चेंडूंत ३ चौकारांसह ४३ धावांवर बाद झाला.
४०७ - सुरेश रैना (१२)
३४४ - विराट कोहली (८)
३४१ - रोहित शर्मा (१२)
२५७ - मुरली विजय (६)
२५० - एमएस धोनी (१४)
२३१ - मनीष पांडे (६)
२१४ - युसूफ पठाण (८)
210 - रिद्धिमान साहा (4)
२०७ - गौतम गंभीर (५)
लिव्हिंगस्टोन व जितेश शर्मा यांनी १२ चेंडूंत ३६ धावांची भागीदारी करून बंगळुरूच्या धावांचा वेग वाढवला. पण, जेमिन्सनच्या फुलटॉसवर लिव्हिंगस्टोन ( २५ धावा) पायचीत झाला. रोमारिओ शेफर्डचा झेल उडाला होता, परंतु प्रविण दुबेला प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. पण, वैशाकने १८व्या षटकात जितेशचा त्रिफळा उडवला. तो १० चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २४ धावांवर बाद झाला. जेमिन्सनने ४ षटकांत ४८ धावा देताना सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. रोमारियो शेफर्ड ( १७) डोकेदुखी वाढवताना दिसला, परंतु अर्शदीपने २०व्या षटकात यॉर्कवर त्याला पायचीत केले. त्यानंतर कृणाल पांड्या ( ४) व भुवनेश्वर कुमार ( १) झेलबाद झाले. RCB ला २० षटकांत ९ बाद १९० धावा करता आल्या.