बेळगाव : बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी म्हैसूर मानस गंगोत्री कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठातर्फे (Mysore Gangotri University) देण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी (Honorary Doctorate Degree) परत घेण्याची विनंती विद्यापीठास केली आहे. याबाबत पालकमंत्री जारकीहोळी यांनी विद्यापीठास पत्र पाठविले आहे. यामध्ये कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आणि व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांना डॉक्टरेट पदवी मागे घेण्याची विनंती केली आहे.
वतीने पालकमंत्री जारकीहोळी यांचा २७ मार्च रोजी मानद डॉक्टरेट डी. लीट पदवी देऊन गौरव करण्यात आला होता. याबद्दल व्यवस्थापन मंडळाचे पालकमंत्री जारकीहोळी यांनी आभार व्यक्त केले आहेत. विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केल्याने समाजाप्रती जबाबदारी वाढली आहे.
सामाजिक सेवेमध्ये असताना हाती घेतलेले अनेक कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने योजना लागू करण्यात येत आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्यासह त्याचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी आपणास अधिक वेळेची आवश्यकता आहे.
यादृष्टीने आपण दिलेली मानद डॉक्टरेट पदवी मागे घ्यावी, अशी विनंती पालकमंत्री जारकीहोळी यांनी पत्राद्वारे केली आहे. हा निर्णय कोणत्याही भावनेच्या भरात घेतलेला नसून, मनापासून घेतला आहे. या निर्णयाचे आपण स्वागत कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे पालकमंत्री जारकीहोळी यांनी विद्यापीठास पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.