Pune Crime : पिस्तूल, लोखंडी हत्यारासह दहशत माजवणारी टोळी हडपसर पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी ताब्यात
esakal June 04, 2025 11:45 PM

पुणे - पिस्तुलातून तरुणावर गोळीबार करून परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीतील पाचजणांना हडपसर पोलिसांनी काही तासांत गजाआड केले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि लोखंडी हत्यार जप्त केले आहे.

मांजरी बुद्रूक येथील गार्गी एंटरप्रायजेससमोर २९ मे रोजी सायंकाळी सुमीत ऊर्फ विलास खवळे, वैभव गवळी आणि चार अनोळखी व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीच्या तरुणावर हल्ला केला. खवळे याने पिस्तूलमधून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर गवळीने लोखंडी हत्यार घेऊन पाठलाग करत धमकी दिली.

घटनेनंतर हडपसर पोलिस ठाण्याच्या दोन पथकांनी वेगाने तपास सुरू केला. सुमीत ऊर्फ विलास दत्ता खवळे (वय २०, रा. सातववाडी, हडपसर), साहिल बाबूराव जगताप (वय २०, रा. घवाटे वस्ती, मांजरी), बसवराज विजय सुतार (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा), वैभव श्रावण गवळी (२२, केशवनगर, मुंढवा) आणि सचिन रेणके (वय ३५, रा. इंदिरानगर, शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शस्त्र पुरवणाऱ्या सचिन रेणकेला पोलिसांनी शिरूरमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार विशेष पथकातील उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलिस अंमलदार अविनाश गोसावी, दीपक कांबळे, अमित साखरे आदींनी ही कारवाई केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.