Stock In News Today : मंगळवारच्या घसरणीनंतर बाजारत काही प्रमाणात दबाव जाणवत होता. तरी व्यवहाराअखेर बाजार हिरव्या निशाणासह बंद झाला आणि घसरणीला ब्रेक लागला. आजच्या व्यवहारात, विविध बातम्यांमुळे वेदांत, ग्लँड फार्मा, येस बँक, पॉवर ग्रिड, बीईएल इत्यादींचे शेअर्स फोकसमध्ये असतील.
वेदांत
भारताच्या वेदांताची लंडनस्थित पालक कंपनी वेदांत रिसोर्सेस (VRL) ५५० दशलक्ष डॉलर्सच्या पुनर्वित्त कर्ज सुविधेचा विचार करत आहे आणि मध्य पूर्व, युरोप आणि जपानमधील अनेक कर्जदारांशी चर्चा करत आहे, असे ईटीच्या अहवालात म्हटले आहे.
ग्लांड फार्मा
Gland Pharma ने सांगितले की त्यांच्या मटेरियल सबसिडियरी सेनेक्सीला फ्रान्सच्या औषध नियामक एएनएसएमकडून ११ निरीक्षणे उद्धृत करून अंतिम तपासणी अहवाल मिळाला आहे.
येस बँक
खाजगी इक्विटी गुंतवणूकदार सीए बास्क इन्व्हेस्टमेंट्सने ओपन मार्केट व्यवहाराद्वारे YES Bank तील आपला हिस्सा २.६२% ने कमी केला आहे.
पॉवर ग्रिड
सरकारी मालकीच्या पॉवर ग्रिडने MEL पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड (MPTL) ही एक विशेष उद्देश कंपनी ८.५३ कोटी रुपयांना विकत घेतली आहे.
आरईसी
REC संचालक मंडळाने बॉण्ड्स किंवा डिबेंचर्सच्या खाजगी प्लेसमेंटद्वारे १.५५ लाख कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने १६ मे रोजीच्या शेवटच्या खुलाशानंतर ५३७ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्याची घोषणा केली.