Crime: '...नाहीतर पोटावर लाथ मारीन'! पतीच्या अनैतिक संबधाचं पितळ उघडं पडलं; रागातून गर्भवती पत्नीचा विकृताकडून छळ
esakal June 06, 2025 02:45 AM

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरही महिला अत्याचाराचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोल्हापूरच्या वरणगे पाडळी परिसरातून हुंड्यासाठी अत्याचाराचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप तिच्या पतीवर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गर्भवती आहे. या काळात तिच्यावर दहा लाख रुपये हुंड्याच्या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. तिच्या पती रोहित दुधाने याने तिच्या पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. पैसे आणि नाहीतर पोटावर लाथ मारेन अशी धमकीही त्याने दिली होती.

यानंतर पीडितेने तिच्या माहेरच्यांना सतत त्रासाबाबत सांगितलं होतं. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. रोहित दुधानेचा दुसऱ्या महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती घरातील इतर मिळाली होती. हे संबंध उघड झाल्यानंतर रोहित दुधाने याने संबंधीत महिलेवरच हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही नोंदवण्यात आला आहे.

करवीर पोलिसांनी याप्रकरणी IPC कलमांतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला आहे. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे आणि तिचे जबाब रेकॉर्ड केले जात आहेत. रोहित दुधानेला अटक होण्याची शक्यता असून पोलिसांनी तपास गतीमान केला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

गर्भवती महिलेसोबत असा क्रूर आणि अमानवी वागणूक ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हेगाराला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. हगवणे प्रकरणानंतरही राज्यात हुंडाबळी थांबले नाहीत हे दुर्दैवी वास्तव या घटनेतून पुन्हा समोर आलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.