Maharashtra Politics: मुंबईत EDचे अनेक ठिकाणी छापे, अभिनेता दिनो मोरियाच्या घरी झाडाझडती
Sarkarnama June 06, 2025 04:45 PM
ट्रम्पमुळे मस्क यांना 12 हजार कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान

अमेरिकन सरकारच्या नवीन विधेयक ‘वन बिग ब्युटीफुल बिल’वरून ट्रम्प आणि मस्क यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. दोघांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मस्क यांना 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे.भारतीय चलनानुसार हे नुकसान 12,88,069 कोटी रुपयांचं आहे. गुरुवारी टेस्लाच्या शेअर्सचे मूल्य 14% कोसळले आणि मस्क यांना एकूण 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

Kalyan News:कल्याण बाजार समितीच्या निवडणुकीत १४० उमेदवार रिंगणात

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणुकीत रंगत वाढत आहे. निवडणुकीच्या रिंगणात राजकीय नेते, माजी संचालक आणि स्थानिक मान्यवर उमेदवार म्हणून उतरले आहेत. अर्ज छानणीमध्ये १५४ अर्जांपैकी १४ अर्ज बाद झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात १४० उमेदवार आहेत. २९ जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

ED News: मिठी नदीतील गाळ काढण्याचा घोटाळा प्रकरणी चौकशी

Mumbai News: मिठी नदीतील गाळ काढण्याचा घोटाळा प्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी छापेमारी केली. आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराची कथित चौकशी ईडीचे अधिकारी करीत आहेत. नदीच्या स्वच्छता प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचारात झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी ईडी अधिकाऱ्यांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर टाकला छापा टाकला आहे

Ajit Pawar: पुणे जिल्हा परिषद येथे शिवराज्य दिन कार्यक्रम

Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पस्थितीत पुणे जिल्हा परिषद येथे शिवराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर सहा जून तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून दीड लाख शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.