Maharashtra Politics Live Update : किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा
Sarkarnama June 06, 2025 04:45 PM
Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा

किल्ले रायगडगावर सहा जून तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून दीड लाख शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा प्रशासनाकडून शिवभक्तांच्या जेवणासाठी पाच हजार किलो तांदूळ आणि एक लाख पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच गडावर १५ बेडचे रुग्णालय, तर पाचाड इथं पाच बेडचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.