Latest Marathi live News Update: नवीन सभापती दिलीप माने यांची बाजार समितीत अचानक भेट; व्यापाऱ्यांना दिल्या कडक सूचना
esakal June 06, 2025 11:45 PM
Solapur Live: नवीन सभापती दिलीप माने यांची बाजार समितीत अचानक भेट; व्यापाऱ्यांना दिल्या कडक सूचना

नूतन सभापती दिलीप माने यांनी आज पहाटे बाजार समितीला अचानकपणे भेट दिली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, वजन मापे योग्य ठेवा, अशा सूचना व्यापाऱ्यांना केल्या यावेळी त्यांनी भाजीपाला, फळे, फूल विभागास भेटी दिल्या.

Live: सर्वोच्च न्यायालयाकडून NEET-PG परीक्षा पुढे; ३ ऑगस्ट ही नवी तारीख

सर्वोच्च न्यायालयाकडून NEET-PG परीक्षा पुढे; ३ ऑगस्ट ही नवी तारीख

Live: पंतप्रधान मोदींच्या हस्ते कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला, ज्यामुळे कटरा आणि श्रीनगर दरम्यान अखंड रेल्वे कनेक्टिव्हिटीचा शुभारंभ झाला.

Nashik Live : अवकाळी पावसामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक, धरणाच्या पाणीपातळीत वाढ

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी

- धरणात २५०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

- मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्के अधिक पाणीसाठा

- मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक, धरणाच्या पाणीपातळीत वाढ

- यंदा नाशिक विरुद्ध मराठवाडा पाण्याचा वाद टळण्याची चिन्हं

Live : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी बँकेची आज पुन्हा चौकशी होणार

हगवणे माय-लेकाने जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आलंय. पण या कटात बँकेच्या एजंटचा काय सहभाग आहे? हे निश्चित करण्यासाठी आज म्हाळुंगे पोलिसांनी संबंधित बँकेच्या प्रतिनिधींना चौकशीला बोलावलं आहे.

PM Modi Live Update: गेल्या ११ वर्षात तरुणांना सक्षम करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले - - पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या ११ वर्षात तरुणांना सक्षम करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले आहेत असं सांगत नवं शिक्षण धोरण, कौशल्य विकास तसंच स्टार्ट-अप्सवर लक्ष केंद्रित केल्यानं आजची तरुणाई विकसित भारताच्या संकल्पात महत्त्वाचा भागीदार बनली - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

PM Modi Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब पुलाची पाहणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब पुलाची पाहणी केली. ते लवकरच या पुलाचे उद्घाटन करणार. तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार ?

ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

PM Modi Live Update: जगातील उंच चिनाब पुलाचे मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

जगातील उंच चिनाब पुलाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

Live Update: शरद पवार घेणार उद्भव ठाकरेंची भेट

शरद पवार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

Live Update: कॅफेत नाही मी राज ठाकरेंच्या घरी भेटायला जाईल- राऊत

कॅफेत नाही तर राज ठाकरेंच्या घरी भेटायला जाणार आहे असे राऊत म्हणाले आहे.

Live Update: इयत्ता दुसरी ते बारावीचा अभ्यासक्रम बदलणार

इयत्ता दुसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे.

Live Update: RBIकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात

RBIकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात.रेपो रेट ५.५ वर, रिझर्व्ह बँकेकडून दिलासा

Live Update: तुमचं होम, कार लोन होणार स्वस्त

होम लोन, कार लोन कमी होणार आहे.

Sikkim Live : सिक्कीममधील थेंग येथील आर्मी हॉस्पिटलजवळ भूस्खलन

उत्तर सिक्कीममधील थेंग येथील आर्मी हॉस्पिटलजवळ काल रात्री भूस्खलन झाले. या घटनेत एका वाहनाचे नुकसान झाले आहे. तथापि, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Mumbai Live : ईडीचे मुंबईत अनेक ठिकाणी छापे

मिठी नदी स्वच्छता घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

कोल्हापुरात शिवराज्याभिषेकाचा शाही सोहळा

कोल्हापुरात 351 वा शिवराज्याभिषेक शाही सोहळा नवीन राजवाडा येथे जोरात साजरा केला जात आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात खासदार छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत. मालोजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव यशराजे यांच्या हस्ते या सोहळ्याचा औपचारिक प्रारंभ झाला असून कोल्हापुरात शिवराज्याभिषेकाच्या या भव्य समारंभाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. रायगडावरही संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या मनात आनंदाची लहर निर्माण झाली आहे.

मुक्ताई पालखीचे आज कोथळी येथून प्रस्थान

संत मुक्ताबाई पालखी सोहळा आज मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध संत मुक्ताई मंदिरातून प्रस्थान करणार आहे. या वारकरी सोहळ्याला ३१८ वर्षांची परंपरा लाभलेली असून, या वर्षीही अनेक भाविक खान्देश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाडा येथून दिंड्यासह या पालखीमध्ये सहभागी होत आहेत. कोथळी गावात वारकरी हळूहळू दाखल होऊ लागले असून, सोहळ्यातील चांदीचा रथ ओढण्यासाठी मानाचा बैलजोडीचा सन्मान राजेश प्रकाश पाटील (नाचणखेडा, जि. बऱ्हाणपूर, म.प्र.) यांना देण्यात आला आहे. ही बैलजोडी मुक्ताईनगरात दाखल झाली आहे आणि भाविकांच्या श्रद्धेने हा सोहळा रंगणार आहे.

नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरूवात

नागपूरमधील महाल येथील शिव तीर्थावर श्री शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्याभिषेक सोहळ्याला विधीवत्तेने सुरुवात झाली. शिवप्रेमींनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती केली. या वेळी राज्यभिषेक सोहळा केवळ नृत्य किंवा संगीताने नव्हे तर शिवचरित्राचे पारायण करून साजरा करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमात अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

विदर्भात मॅान्सून सक्रीय होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार

विदर्भात मॅान्सून सक्रीय होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये १३ ते १४ जूनला मॅान्सून सक्रीय होईल, तर पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये १७ ते २० जूनपर्यंत मॅान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मॅान्सून २८ मे रोजी गडचिरोलीत पोहोचला असला तरी तो आठ दिवसांपासून तिथेच स्थिरावलेला आहे. या दरम्यान, जिल्ह्यांमध्ये तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उकाड्याचा त्रास सुरू राहणार आहे. त्यामुळे लोकांना आणखी काही दिवस उकाड्याला सहन करावे लागेल.

Nagpur Live: सुनिता जामगडे प्रकरणातील कारगिल पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रिया

भारत-पाकिस्तान सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली सुनिता जामगडे यांच्याविरुद्ध कारगिल पोलिसांनी विशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, प्रोडक्शन वॉरंट न मिळाल्याने कारगिल पोलिसांनी आवश्यक तपासासाठी आणि पुनर्रिक्रीएशनसाठी नागपूरमध्ये सुनिताला आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सध्या सुनिता नागपूर मधील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे आणि कारगिल पोलिसांनी पुढील आठवड्यात स्थानिक न्यायालयाचा वॉरंट घेऊन नागपूर न्यायालयात पुन्हा अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुनिताचा नागपूर कारागृहातील मुक्काम अधिक काळ टिकण्याची शक्यता वाढली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.