भंडारा - अड्याळ पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दोन वेगवेगळ्या गावांत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका घटनेत १४ वर्षीय मुलगी गर्भवती आहे. दोन्ही घटनेतील आरोपींना अड्याळ पोलिसांनी अटक केली आहे.
अड्याळ पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात ६ वर्षीय मुलगी गुरुवारी (ता. ५) सायंकाळी आपल्या घरासमोर खेळत असताना आरोपी गणेश गोटेफोडे (वय ३०, रा. वाकेश्वर याने तिचे तोंड दाबून लगतच्या वाडीत नेले. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेने वारंवार आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने तिला सोडले नाही. त्यानंतर मुलगी रडत घरी आली व तिने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. आईने तत्काळ अड्याळ पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी गणेश गोटेफोडे याला अटक केली आहे.
दुसरी घटना याच पोलिस ठाण्याअंतर्गत दुसऱ्या गावात उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपीने तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध प्रस्तापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. अभय विलास धुर्वे (वय २१, रा. बोरगाव खुर्द) असे आरोपीचे नाव आहे.
ही घटना फेब्रुवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घडली. आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारिरीक संबंध निर्माण केले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.