पुणे : नवीन गृहनिर्माण धोरण करण्यात सरकारमार्फत करण्यात येत आहे. यासाठी विकसकांनी सूचना दिल्यास त्यांचा अंतर्भाव करण्यात येईल, असे भाष्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नवीन गृहनिर्माण धोरणानुसार येत्या ५ वर्षात एकूण 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर 'प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे' या योजनेतही बांधकाम व्यवसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.