शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. या पत्रासोबत मोहन भागवत यांना नरकातला स्वर्ग या पुस्तकाची प्रत पाठवली आहे. आपल्याला तुरुंगात टाकून विरोधाचा आवाज उघडपणे दाबण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणांकडून गेला असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार?राज-उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, लोकशाहीत कोणाला कुणासोबत जायचे, याचा पूर्ण अधिकार आहे. जितके अधिक सहकारी असतील तितके महाविकास आघाडीसाठी चांगले आहेत. एक साथ मिळून महाराष्ट्रासाठी काम करू. राज ठाकरे हे जर सोबत येत असतील तर आम्हाला कोणतीच अडचण नाही.
‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे. अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले आहे की, “त्याग, श्रद्धा, समर्पण या उदात्त मूल्यांची शिकवण देणारा ‘ईद-उल-अज़हा’चा सण समाजात एकता, शांतता, बंधुता, सौहार्द वाढवणारा आहे. हा सण एकमेकांशी प्रेम, सहकार्य, आपुलकीची भावना दृढ करणारा असून, समाजातील वंचित, गरजू, उपेक्षित घटकांप्रती आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा आहे. या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो,”
सुनील तटकरेंनी राजीनामा दिला तर मी लगेच राजीनामा देईल- आमदार थोरवेरायगडच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरेंना टार्गेट केले आहे. ते म्हणाले, सुनील तटकरे यांनी राजीनामा दिला, तर मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे. राष्ट्रवादीपुढे कधीच झुकणार नाही.
Vijay Mallya : मी भाजप मंत्र्याला सांगून देश सोडला, विजय मल्ल्याचा गौप्यस्फोटबँकांचे 6200 कोटींचे कर्ज बुडवून इंग्लंडला पळून गेलेल्या विजय मल्ल्याने प्रथमचे मोठा खुलासा केला आहे. एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, मी चोर अन् पळकुटा नाही. मी तत्कालीन अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांना सांगूनच देश सोडला होता.
Mla Vishwanath Bhoir Rajesh More police Custody : शिवसेनेचे दोन आमदार पोलिसांच्या ताब्यात, दुर्गाडी परिसरात आंदोलनबकरी ईद निमित्त दु्र्गाडी किल्ले परिसरात मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. त्यामुळे दुर्गाडी मंदिरात जाण्यासाठी हिंदू बांधवांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याविरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि राजेश मोरे यांनी समर्थकांसह तीव्र आंदोलन करत होते. त्यामुळे पोलिसांनी भोईर आणि मोरे यांना ताब्यात घेतले आहे.
मंदिरात जाण्यासाठी बंदी, दुर्गाडी परिसरात हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलनदुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. याच परिसरात असलेल्या दुर्गाडी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी हिंदू बांधवांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना तसेच हिंदुत्ववादी संघटनामुळे या परिसरात घंटानाद आंदोलन करत आहेत. मागील 35 वर्षांपासून हे आंदोलन केले जाते.
MNS Shivsena UBT Alliance : उद्धव ठाकरेंसोबत मनसेच्या युतीची चर्चा, राज ठाकरेंनी बोलवली बैठकउद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीची चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर घडामोडींना वेग आला असून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) आपल्या पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यामुळे राज हे या बैठकीत उद्धव ठाकरेंबाबत युतीच्या चर्चांवर भाष्य करण्याची शक्यता आहे.