Maharashtra Political Live Update : मी भाजप मंत्र्याला सांगून देश सोडला, विजय मल्ल्याचा गौप्यस्फोट
Sarkarnama June 07, 2025 04:45 PM
Vijay Mallya : मी भाजप मंत्र्याला सांगून देश सोडला, विजय मल्ल्याचा गौप्यस्फोट

बँकांचे 6200 कोटींचे कर्ज बुडवून इंग्लंडला पळून गेलेल्या विजय मल्ल्याने प्रथमचे मोठा खुलासा केला आहे. एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, मी चोर अन् पळकुटा नाही. मी तत्कालीन अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांना सांगूनच देश सोडला होता.

Mla Vishwanath Bhoir Rajesh More police Custody : शिवसेनेचे दोन आमदार पोलिसांच्या ताब्यात, दुर्गाडी परिसरात आंदोलन

बकरी ईद निमित्त दु्र्गाडी किल्ले परिसरात मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. त्यामुळे दुर्गाडी मंदिरात जाण्यासाठी हिंदू बांधवांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याविरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि राजेश मोरे यांनी समर्थकांसह तीव्र आंदोलन करत होते. त्यामुळे पोलिसांनी भोईर आणि मोरे यांना ताब्यात घेतले आहे.

मंदिरात जाण्यासाठी बंदी, दुर्गाडी परिसरात हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन

दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. याच परिसरात असलेल्या दुर्गाडी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी हिंदू बांधवांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना तसेच हिंदुत्ववादी संघटनामुळे या परिसरात घंटानाद आंदोलन करत आहेत. मागील 35 वर्षांपासून हे आंदोलन केले जाते.

MNS Shivsena UBT Alliance : उद्धव ठाकरेंसोबत मनसेच्या युतीची चर्चा, राज ठाकरेंनी बोलवली बैठक

उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीची चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर घडामोडींना वेग आला असून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) आपल्या पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यामुळे राज हे या बैठकीत उद्धव ठाकरेंबाबत युतीच्या चर्चांवर भाष्य करण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.