राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केलं आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, असं म्हणत नितेश राणे यांनी खळबळ उडून दिली आहे. राणे यांनी एकप्रकारे आदित्य ठाकरेंच्या अटकेचे संकेतच दिले आहेत. डिनो मोरियाच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुंबई नालेसफाई प्रकरणात त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचाच धागा पकडत मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा मोठा दावा केला आहे.
Sudhakar Badgujar : भाजपात जाणार का? सुधाकर बडगुजरांनी स्पष्टच सांगितलं काय ते...ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या सुरु आहेत. भाजपही त्यांना पक्षात घेण्यास सकारात्मक आहे. दरम्यान यासंदर्भात बडगुजर यांनी स्वत: प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले,
मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्ते आणि समर्थकांशी बोलून निर्णय घेणार आहे. भाजपमध्ये वरीष्ठ पातळीवर नेमक्या काय हालचाली चालू आहेत ते मला माहिती नाही. मी पक्षात प्रवेश करताना कोणत्याही अटी शर्ती लावणार नाही. सीमा हिरे यांच्याविरोधात मी निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. सर्व पक्षातून बोलवणं आहे, कुठं जायचं ते लवकरच ठरवू असं ते म्हणाले आहेत.