बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, संजय दत्त, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ अशा अनेक अभिनेत्यांची फौज असलेल्या 'हाऊसफुल ५' ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. ६ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटर पर्यंत खेचून आणलंय. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झालाय. तेव्हा चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभलाय. पहिल्याच दिवशी चित्रपटाने दमदार कमाई करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. आता 'हाऊसफुल ५'च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.
'हाउसफुल ५'ने पहिल्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी जमवण्यात यश मिळवलं. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 'हाऊसफुल ४'चा रेकॉर्ड मोडलाय. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी १९ कोटींची कमाई केली होती. मात्र 'हाऊसफुल ५' ने हा रेकॉर्ड मोडलाय. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचा परिणाम आता पहिल्या दिवशीच्या कमाईवर दिसून आलाय.
सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार'हाऊसफुल ५'ने पहिल्या दिवशी २३ कोटींची कमाई केलीये. चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी देखील जोरदार सुरु आहे. शिवाय चित्रपटाला रिव्ह्यूदेखील चांगले मिळाले आहेत. यामुळे चित्रपटाला यागोष्टीचा फायदाच होणार आहे. त्यामुळे या विकेंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी हा चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. पहिल्या ३ दिवसात चित्रपटाची कमाई १०० कोटींवर पोहोचल्यास नवल वाटायला नको.
'हाऊसफुल ५' सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बजावा, नरगिस फाकरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रगंदा सिंह, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर आणि आकाशदीप साबिर हे कलाकारही आहेत. शिवाय चित्रपटाला दोन क्लायमॅक्स आहेत.