What is Man Mums : आजचं जग फारच वेगवान झालं आहे. आज इथे कोणालाही कोणाशी बोलायला उसंत नाही. आपलं दु:ख ऐकूण घेण्यासाठीही अनेकदा आपल्याला योग्य व्यक्ती सापडूनही शोधत नाही. आता मात्र ही अडचण दूर झाली आहे. आता मॅन मम्स (Man Mums) नावाची एक पद्धत समोर आली आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक महिला पुरुषांची गळा भेट घेऊन पुरुषांनाच पैसे देत आहेत.
मॅन मम्स हा प्रकार चीनमध्ये फारच लोकप्रिय झाला आहे. रोजच्या तणावातून मुक्त होण्यासाठी चीनच्या तरुणी मॅन मम्सचा पुरेपूर वापर करत आहेत. याच हग करण्याच्या किंवा गळाभेट करण्याच्या नव्या पद्धतीमुळे पुरुषांचीही चांगलीच कमाई होत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने या मॅन मम्स सर्व्हिसबद्दल एक वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार मॅन मम्स हा शब्द बलदंड देहयष्टी असणाऱ्या पुरुषांसाठी वापरला जातो. आजकाल महिला कामामुळे तणावात असतात, अभ्यासाचे ओझे किंवा अन्य एखाद्या वैयक्तिक कारणामुळेही त्या तणावग्रस्त असल्याचे समोर येते. याच तणावातून मुक्त होण्यासाठी महिला आजकाल मॅन मम्सकडून सेवा घेत आहेत. विशेष म्हणजे मॅन मम्स असलेल्या पुरुषांना हग करण्यासाठी त्या 20 ते 50 युआन (250 ते 600 भारतीय रुपये) देण्यासाठीही तयार आहेत.
काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. थिसिस पूर्ण केल्यानंतर मी तणावात होते. त्यामुळे मला कोणालातरी हग करायचं होतं. त्यासाठी मी पैसे देण्यासाठीही तयार होते. त्यावेळी तिने तिच्या शाळेतीलच एका व्यक्तीची गळाभेट घेतली. त्यानंतर तिला तणावातून बाहेर आल्याचे वाटले, असे त्या विद्यार्थिनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. ही पोस्ट तेव्हा चांगलीच व्हायरल झाली होती. त्यानंतर चीनमध्ये गळाभेट करणाऱ्या पुरुषांची मागणी वाढली आहे.
रिपोर्टनुसार मॅन मम्स तुम्हाला चीनच्या मट्रो स्टेशन, शॉपिंग मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी सापडतात. अनेकवेळा महिला, तरुणी मॅन मम्सना हग करून त्यांच्या मनातील गोष्टी सांगतात. यामुळे महिलांचे मन हलके होते. शरीराची ठेवण, त्यांची बोलण्याची पद्धत, तो कसा दिसतो या सर्व बाबींचा विचार करून चीनमध्ये महिला मॅन मम्सची निवड करतात.