बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. कार्यकर्त्यांची मागणी आहे की स्वतंत्र पॅनल उभा करावं मात्र या पॅनलमध्ये नेमकं काय होतं शरद पवार अजित पवारांसोबत जातात की शरद पवार चंद्रराव तावरे सोबत जातात की शरद पवार स्वतंत्र पॅनल उभा करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Pune Live : पुण्यातील Z ब्रीजवर चढला ट्रकपुणे तिथे काय उणे या वाक्याचा उदगार रोज केला तरी चालेल कारण पुण्यात घडतंच असं काही! आता बघा पुण्यातील प्रसिद्ध Z ब्रीज म्हणजेच काकासाहेब गाडगीळ पूल हा फक्त दुचाकीस्वारांसाठी आहे. शहरातील नारायण पेठेतून जंगली महाराज रस्त्यावर जाण्यासाठी हजारो दुचाकी यावरून ये जा करतात. आता अचानक या पुलावर एका ट्रक ने जायचा प्रयत्न केला मात्र इकडे तर दुसरी कुठली गाडी दिसेना या पुलावर आपण आपण जाऊ नाही शकत हे समजताच या ट्रक चालकाने शहाणपण दाखवलं आणि तो तिथेच थांबला. तोपर्यंत मागे दुचाकींची रांग लागली होती अशाच एका दुचाकीस्वाराने हा व्हिडिओ टिपला.
Live : लोणार अभयारण्याचा 25 वा स्थापना दिवस उत्साहात साजरामागील 25 वर्षापूर्वी लोणार सरोवर अभ्यारण्याची घोषणा करण्यात आली होती, आज त्या लोणार अभ्यारण्याचा वर्धापण दिवस साजरा करण्यात आला. 8 जून 2000 या दिवशी स्थापन झालेल्या लोणार अभयारण्याने आज आपली 25 वर्षे पूर्ण केली.
Live : अमरावतीजवळ भीषण अपघात, मजूरवाहतूक करणारी गाडी पलटीअमरावती नजीक असलेल्या नांदगाव पेठ येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या ओमणी कारला अपघात
अमरावती नागपूर नवीन बायपास वरील घटना
अपघात मध्ये 9 मजूर जखमी 4 जणांची प्रकुती गंभीर
सर्व जखमी रुग्णांना इर्विन रुग्णालय मध्ये केले दाखल उपचार सुरु
Live : भुशी डॅममध्ये बुडून २ तरुणांचा मृत्यूभुशी डॅम (भुशी धरण) मध्ये बुडून २ तरुणांचा मृत्यू
वर्षाविहारासाठी २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
रविवार असल्याने आज लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे उत्तर प्रदेशच्या २ तरुणांचा मृत्यू
Maharashtra Live: दुर्गम नक्षलग्रस्त गाव काटेझारी येथे पहिल्यांदाच सरकारी बसमहाराष्ट्रातील दुर्गम नक्षलग्रस्त गाव काटेझारी येथे पहिल्यांदाच सरकारी बस पोहचली आहे.
Pune Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन पुण्यात होणार, तयारी पूर्णराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन मंगळवारी असून त्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारी पूर्ण झाली आहे. हा वर्धापनदिन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
Live: १० कोटी महिला बचत गटांत; मोदींनी दिला महिलांना नवा आत्मविश्वासपंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली,भारताने महिला सक्षमीकरणात ऐतिहासिक परिवर्तन पाहिले आहे.
प्रतिष्ठेपासून विकासापर्यंत,राष्ट्र उभारणीत नारी शक्तीने केंद्रस्थानी स्थान मिळवले आहे
माता मृत्युदर कमी झाला तर १० कोटींहून अधिक महिला बचत गटांमध्ये सामील झाल्या
Solapur Live: सुभाष उद्यानाची दुरवस्था; सुशोभीकरणाची गरज दिवसेंदिवस वाढतेपाच्छा पेठतील सुभाष उद्यान पूर्णपणे भकास झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या उद्यानातील हिरवळ गायब झाली आहे.
उद्यानात दिवसाढवळ्या कोणीही काहीही करू शकतो अशी स्थिती आहे. नेताजींच्या पुतळा परिसरातील अनेक फरश्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे सुशोभीकरणाची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील जलशुध्दीकरण प्रकल्प अद्यापही बंद आहे.
नजीकच्या पदपथावर सर्वत्र घाण साचलेली आहे. त्यामुळे दुर्गंधीचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे. महापालिकेच्या उदासिनतेमुळेच सर्वत्र भकास अवस्था झाली आहे.
आठ ते पंधरा दिवसाला एकदा कचरा संकलन करण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. लवकरात लवकर याठिकाणची स्वच्छता व उद्यानाचे सुशोभीकरण करण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.
Live: इनडोअर स्टेडिअम बनले दारूड्यांचे अड्डे, खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरणसात रस्ता येथील इनडोअर स्टेडिअम परिसरात अनेक दिवसांपासून दारूड्यांचा वावर वाढला आहे. यामुळे खेळाडू व स्थानिकांनाही त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेकदा या दारूड्यांच्यातच बाचाबाची होऊन प्रकरण शिवीगाळ व मारामारीपर्यंत देखील जाते. परिसरातील शांतता भंग पावल्याने स्थानिकांसह खेळाडूंमध्येही भीतीचे वातावरण आहे.
इनडोअर परिसरात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. सकाळी भंगार गोळा करणारे येऊन ते घेऊन जातात. त्यावर त्यांची दिवसभराची उपजीविका भागते यावरून बाटल्यांचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
महापालिका, जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे याबाबत तोडगा काढण्याची गरज आहे. लवकरात लवकर संयुक्त कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
CM Fadnavis Live : एशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसमहाराष्ट्रात 5 लाख पंप लागेल आहेत
एशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करणार
सरकारी प्रमुख इमारती सौर ऊर्जा झाले पाहिजेत
हायड्रोजन क्षेत्रात महाराष्ट्राने भरारी घेतली आहे
Nitin Gadkari Live : पाणी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय : नितीन गडकरीपाणी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे
मागील काळात विदर्भात शेतकऱ्यांनी आत्महत्या मोठ्या प्रमाणात केल्या कारण आपल्या कडे सिंचन व्यवस्था कमी आहे
जल संवर्धन हा महत्वाचा विषय आहे , जो पर्यंत सिंचन व्यवस्था शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत आत्महत्या कमी होत नाही
मराठवाड्याच्या अनेक भागात आता प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी पोहचेल
91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडणार आहे. तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात साहित्य संमेलन पार पडणार आहे. साताऱ्यात पार पडणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे. साताऱ्यातील शाहू स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. साहित्य संमेलनाचं हे 99 वं वर्षं आहे.
Solapur Live : माळशिरसच्या ८०० युवकांकडून रायगडावर अभिवादन; ‘शिवप्रसाद’तर्फे नातेपुते शहरातून १६ बसगाड्यांची सोयशिवराज्याभिषेक दिनी माळशिरस तालुक्यातील ८०० युवकांनी किल्ले रायगड येथे जाऊन शिवरायांना अभिवादन केले. शिवप्रसाद उद्योग समूह, दहिगाव (ता. माळशिरस) यांच्या तर्फे किल्ले रायगड वारीसाठी नातेपुतेमधून १६ बसगाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. वारीचा प्रारंभ प्रमुख पाहुणे अकलूजचे पोलिस उपअधीक्षक नारायण क्षीरगावकर, नातेपुते पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे, संयोजक शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे व माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा शरद मोरे यांच्या हस्ते झाला.
Live : विशाळगडावर कुर्बानी विनाच बकरी ईद; उरुसाला पुरातत्व विभागाच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तन्यायालयीन अटी आणि नियमांच्या अधीन राहून विशाळगडावर ईद सण शांततेत कुर्बानी विना पार पडला. मुबारक मुजावर यांच्या खाजगी जागेत गट क्रमांक 19 मध्ये पडदे लावून कुर्बानी साठी जागा बंदिस्त करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत कुर्बानी करण्यास विशाळगडवासीय तिथ फिरकलेच नाहीत. उच्च न्यायालयाने कुर्बानी साठी परवानगी देऊन ही गडावरती हा विधी झाला नाही. दरम्यान राज्य पुरातत्व विभागाने विशाळगडावरील उरसास परवानगी नाकारली आहे. राज्य संरक्षित स्मारकासह संवेदन परिस्थितीचे कारण देत ही परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था च्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली राज्य राखीव पोलीस दलाचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. त्यातच एक जून ते 15 जून या कालावधीत जिल्हा प्रशासनाने विशाळगडाच्या परिसरामध्ये बंदी आदेश लागू केला असल्याने गडावर भाविकांची तुरळक वर्दळ पाहायला मिळाली. दरम्यान विशाळगडावर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत येणाऱ्या भाविकाचं आधार कार्ड बघून चौकशी करूनच पोलीस गडावर सोडत आहे.
Live : महिलेला बसमध्ये अचनाक रक्तदाबाचा त्रास; उतरण्यासाठी वाहकाकडून पैशांची मागणी', पुणे बसमधील प्रकारबीड ते पुणे या एस. टी. बसने प्रवास करणाऱ्या विवाहितेला अचानक रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने बसमधून उतरून द्या, अशी विनंती वाहकाला केली. ‘मला शंभर रुपये दिल्याशिवाय बस थांबवणार नाही,’ अशी बेकायदेशीर भूमिका घेतली. शंभर रुपये घेतल्यानंतरच महिलेला बसमधून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. ४) घडला. या घटनेने मनस्ताप सहन करण्याची वेळ महिलेच्या कुटुंबावर आली.
बीएसएफच्या जवानांनी आज सकाळी एक पिस्तूल यशस्वीरित्या जप्त केलेजप्तीचा हा सिलसिला सुरूच ठेवत, बीएसएफच्या जवानांनी विश्वासार्ह माहितीच्या आधारे कठोर कारवाई करत, व्यापक शोध मोहीम सुरू केली आणि आज सकाळी एक पिस्तूल यशस्वीरित्या जप्त केले. हे शस्त्र एका बागायती भातशेतात गंजलेल्या अवस्थेत जप्त करण्यात आले. अमृतसरमधील हवेलियान गावाजवळील ही जप्ती घडली आणि काही दिवसांपूर्वी ते टाकण्यात आले असावे असा अंदाज आहे: पीआरओ, पंजाब फ्रंटियर, सीमा सुरक्षा दल
पुण्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनच्या बाबत बैठक सुरू होणार99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीची बैठक सुरू
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यालयात सदस्यांची बैठक सुरू आहे
या बैठकीत यंदाच्या साहित्य संमेलनाचे नियोजन ही करण्यात येणार आहे
मराठ्यांची राजधानी अशी ओळख असणाऱ्या राजधानी सातारा येथे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी 'महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेकडून निमंत्रण पाठवण्यात आले होते
मात्र आज साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर समिती संमेलन स्थळाची घोषणा करणार आहे
Live Update:बिष्णुपूरमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आलीपूर्व आणि पश्चिम इम्फाळमधील ताज्या दृश्यांमध्ये राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये रात्री उसळलेल्या हिंसाचाराचे परिणाम दिसून येत आहेत. इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये चार किंवा त्याहून अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बिष्णुपूरमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Live : रस्ता नसल्याने गाढवावरून वाहतूकगावापर्यंत वाहन पोहोचत नसल्याने गाढवावरून केली जाते वाहतूक....
एक गोणी खत घेऊन जाण्यासाठी पार करावी लागते दोनशे फूट खोल दरी....
उंच डोंगर पार करत 15 किलोमीटर जंगलातून करावा लागतो गाढवासोबत प्रवास....
वाहतुकीसाठी गाढवासोबतच आदिवासी बांधवांना देखील करावी लागते जीवघेणी कसरत...
दुर्गम भागातील समस्येकडे सरकारचं दुर्लक्ष....
वारंवार मागणी करूनही रस्ता होत गावकरी हताश....
Live : वेंगुर्ले पॉवर हाऊस भागात पाणी साचल्याने नागरिक आक्रमकवेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत पॉवर हाऊस नजीक सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामामुळे पाणी साचून राहीले आहे.
वेंगुर्ले विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर या गटार बांधकामाच्या सुरू असलेल्या कामा मुळे पावसाचे पाणी साचून रोगराई होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. ठेकेदाराने उशिरा काम सुरू केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Washim Live : शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी वाशीम जिल्ह्यात दाखलअत्यंत शिस्तबद्ध पालखी समजल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सकाळी वाशीम जिल्ह्यातील मेडशी इथं आगमन झाले.
शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचे अकोला जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्यात पालखीचा प्रवेश झाल्याने भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले.
यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
पालखीचा आजचा मुक्काम श्रीक्षेत्र डव्हा नंगेनाथ महाराज यांच्या मंदिरास्थळी असणार आहे.
पुढील चार दिवस वाशीम जिल्ह्यात पालखीचा विविध ठिकाणी मुक्काम राहणार असून, त्यानंतर पालखी सोहळा मराठवाड्याच्या दिशेने हिंगोली जिल्ह्यात मार्गस्थ होणार आहे.
तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणात मुख्य आरोपीला 9 जूनपर्यंत पोलिस कोठडीतुळजापुर येथील ड्रग्स तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी विनोद गंगणे याला न्यायालयाने 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली असली तरी न्यायालयाने सोमवारपर्यंतची कोठडी मंजूर केली. 14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथून ड्रग्ससह तिघांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा मोठा छडा लागला. यामध्ये मुंबई, पुणे आणि सोलापूरशी संबंधित महत्त्वाच्या कनेक्शनचा उलगडा झाला असून आतापर्यंत एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 17 आरोपी अजूनही फरार आहेत.
बीडमध्ये कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कुख्यात दरोडेखोराला अटकबीड जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर भगवान ईश्वर भोसले याला नागझरी येथून पहाटे दोन वाजता अटक केली. तो आपल्या तिसऱ्या पत्नीला भेटण्यासाठी नागझरीला आला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. आरोपीने पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या सावधगिरीमुळे तो निष्फळ ठरला. महिलांनीही पोलिसांवर आक्रमक होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते आणि त्यांच्या सहकार्याने ही धडक कारवाई यशस्वी झाली.
नागपूर महापालिका प्रशासन आता डिजिटल ट्रकवरनागपूर महापालिकेने दैनंदिन प्रशासकीय कामकाजात ई ऑफिस डिजिटल प्रणालीचा वापर सुरू करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सामान्य प्रशासन विभागापासून या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या एकूण 48 विभागांमध्ये कागद विरहित कामकाज होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वी काही विभागांमध्ये ही प्रणाली लागू केली होती, त्याच धर्तीवर आता नागपूर महापालिकाही डिजिटल ट्रकवर येत आहे. यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढणार असून, नागरिक आणि अधिकारी दोघांनाही याचा थेट फायदा होणार आहे.
Pune : बस वेळेत सुरू ठेवा, प्रवासी संख्या वाढवा; पीएमपी अध्यक्षांचा आगारप्रमुखांना आदेशवारंवार बस रस्त्यात बंद पडल्यामुळे संचलनातील फेऱ्यांवर परिणाम होत आहे. परिणामी प्रवाशांना बसची वाट पहावी लागते सर्व मार्गावरील बसची वारंवारता नियोजित वेळेत सुरू ठेवा, असे आदेश पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व आगार प्रमुखांना दिले आहेत नुकतेच पीएमपीने तिकीट दर वाढविले आहे. त्यामुळे उत्पन्नदेखील वाढत आहे बस मार्गावर सोडताना देखभाल दुरुस्ती करून सोडावी. प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
Raigad : तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणारकिल्ले रायगडावर 9 जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील देण्यात आले असून त्यांचा दौरा आला नसला तरी ते देखील येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे. यासह राज्यातील इतर मंत्री, स्थानिक खासदार आणि आमदार यांना देखील निमंत्रण दिल असून हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी शिवप्रेमींनी उपस्थित रहावं असं निमंत्रण मंत्री भरत गोगावले यांनी दिल आहे.
Pune : महसूलनंतर पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर, आकडेवारी आली समोरमहसूल पाठोपाठ पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गेल्या पाच महिन्यात केलेल्या कारवाईतून आले दिसून
एक जानेवारी ते 31 मे पर्यंत महसूल विभागात सहा तर पोलीस विभागात पाच कारवाई
पुणे विभागात मार्च महिन्यात सर्वाधिक सहा गुन्हे लाचखोरी प्रकरणी नोंदवले गेले
भ्रष्टाचारात पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानी महसूल विभाग तर दुसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग असल्याचे आले समोर
पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाई मधून आकडेवारी समोर
Raigad : रायगडावर असणाऱ्या धनगर वस्तीला पुरातत्व खात्याच्या नोटीसारायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्याने गड रिकामा करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. धनगर समाजाची ही लोक झोपडीवजा घर बांधून गेल्या सात पिढ्यांपासून रायगड किल्ल्यावर रहात आहेत. गडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना दही, ताक, चहा, नाष्ट्याची सुविधा पुरवून हे लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. गडावरील बाजार पेठ आणि जगदीश्वर मंदीरच्या खालच्या बाजूला धनगर समाजाच्या वस्ती असून केंद्रीय पुरातत्व विभागाने ही वस्ती खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
Akola : विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेशअकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अकोला महापालिकेचे माजी महापौर मदन भरगड यांनी मोठा निर्णय घेतला. मदन भरगड यांनी काँग्रेसची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रीवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थित भरगड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Gadchiroli : गोदावरी नदीत ६ मुलं बुडाली, शोध सुरूगडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत तेलंगणा हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीत सहा मुलं बुडाली आहेत. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडालीय. अंघोळीला गेलेली मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पण मुलं सापडली नव्हती.
Pune News : पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या धडकेनंतर डंपर उलटलापुणे सातारा महामार्गावरील केळवडे येथे कंटेनरची डंपरला धडक बसून अपघात झाला. डंपरचा मागचा टायर फुटल्यानं डंपर उलटला. पुण्याच्या दिशेने जात असताना मालवाहू कंटेरनरने डंपरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर डंपरचा टायर फुटून डंपर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
Pune Rain : पुण्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसमान्सूनची उत्तर सीमा ही स्थिर असून पूर्व विदर्भ ते अंतर्गत कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत द्रोणिका रेषा जात आहे. या प्रभावामुळे पुण्यात रविवारीही वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.