Supriya Sule’s reaction to talks of both nationalist parties coming together
Marathi June 09, 2025 03:27 AM


गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका व कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकारणात जोर धरला आहे. अशातच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे : राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये अद्याप युती झालेली नाही. तर दुसरीकडे पवार काका-पुतणे देखील एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होताना दिसत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका व कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकारणात जोर धरला आहे. अशातच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Supriya Sule’s reaction to talks of both nationalist parties coming together)

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर भूमिका स्पष्ट करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा माझा निर्णय नाही, हा पक्षाचा निर्णय आहे. कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातच शरद पवार यांच्या कामांची पद्धत तुम्ही सर्वांनी सहा दशकं पाहिलेली आहे. शरद पवार जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मनात जे काही असेल, तोच निर्णय पक्ष घेईल. आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक घेत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Congress : निवडणुकीनंतर किरण कुलकर्णींना साइड पोस्टींग का दिली, त्यांची नार्को टेस्ट करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

अजित पवार काय म्हणाले होते? 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आठवड्याभरापूर्वी म्हणाले होते की, माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे (शरद पवार कुटुंब) आले होते. घरातील कार्यक्रम असतील तर कुटुंब म्हणून आम्ही सर्व एकत्र येत असतो. आमची विचारधारा वेगवेगळी आहे, पण बाकीच्या बाबतीत कुटुंब म्हणून सुख-दु:खात आम्ही एकत्र असतोच, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.

हेही वाचा – Sanjay Raut : …तर पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल होऊ शकतो, काय म्हणाले संजय राऊत



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.