Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा 'चिझी एग टोस्ट', सोपं आणि लाजवाब
esakal June 09, 2025 01:45 PM

Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि चवीने करणारा असावा. तसेच रोज नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वांना पडतो. जर तुम्ही झटपट आणि चविष्ट नाश्त्याच्या शोधात असाल, तर चिझी एग टोस्ट बनवू शकता. अवघ्या 10-15 मिनिटांत तयार होणारी ही सोपी रेसिपी आठवड्यातील पहिल्या दिवसाला बनवेल. पौष्टिक आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया चिझी एग टोस्ट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

'चिझी एग टोस्ट' बनवण्यासाठी लागणारे साहित्य

4 ब्रेड स्लाइस

2 अंडी

1/2 कप ग्रेट केलेलं चीज

2 टेबलस्पून दूध

1 टेबलस्पून बटर

1/4 टीस्पून काळी मिरी पावडर

चवीनुसार मीठ

बारीक चिरलेली कोथिंबीर

'चिझी एग टोस्ट' बनवण्याची कृती

चिझी एग टोस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी अंड्याचं मिश्रण तयार करावे. एका वाटीत अंडी फोडा. त्यात दूध, मीठ, काळी मिरी पावडर घालून चांगलं फेटून घ्या. नंतर ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावा. नॉन-स्टिक तव्यावर मध्यम आचेवर ब्रेड स्लाइस हलक्या तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर तव्यावर बटर वितळवा. अंड्याचं मिश्रण तव्यावर पसरवा. त्यावर ग्रेट केलेलं चीज समान रीतीने पसरवा. नंतर ब्रेडच्या स्लाइस अंड्याच्या मिश्रणावर ठेवा. हलक्या हाताने दाबा जेणेकरून अंडं ब्रेडला चिकटेल. अंडं शिजलं की काळजीपूर्वक उलटा आणि दुसरी बाजू 1-2 मिनिटं भाजा. कोथिंबीरने सजवून, टोमॅटो केचप किंवा सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.

टीप: तुम्ही चीजच्या प्रमाणात बदल करू शकता किंवा हिरवी मिरची, ओरेगॅनो टाकून चव वाढवू शकता. हा नाश्ता 10-15 मिनिटांत तयार होतो आणि सकाळी झटपट, पौष्टिक पर्याय आहे!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.