Alia-Ranbir : रणबीर-आलियाच्या लग्जरी बंगल्याची पहिली झलक, राहाच्या नवीन घराची किंमत किती? पाहा VIDEO
Saam TV June 09, 2025 05:45 PM

आलिया भट्टचं (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बॉलिवूडचे पावर कपल आहे. हे दोघे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांपासून आलिया आणि रणबीर त्यांच्या नवीन घराच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र त्यांचे आलिशान बंगला तयार झाला आहे. या बंगल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणि रणबीरच्या नवीन घराची झलक पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. हा आलिशान बंगला येथे आहे. बंगल्याच्या कामाची पाहाणी करण्यासाठी कायम आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बंगल्यावर येत होते. अनेकदा ते स्पॉट झाले.

बंगल्याची किंमत काय?

कपूर आणि आलिया भट्ट यांच्या बंगल्याचे नाव 'कृष्णा राज' (Krishna Raj ) असे आहे. हा आलिशान बंगला रणबीर आणि आलियाने खास त्यांची लाडाची लेक राहासाठी बनवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार,रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या या नवीन कोऱ्या आलिशान घराची किंमत तब्बल 250 कोटी रुपये आहे. अखेर रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे आलिशान घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

रणबीर-आलियाच्या आलिशान घराचे नाव रणबीर कपूरची दिवंगत आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. रणबीर-आलियाचा हा आलिशान बंगला चार मजली आहे. बंगल्याच्या बाल्कनीमध्ये छान हिरवळ पाहायला मिळत आहे. रणबीर कपूर , आलिया भट्ट आणि त्यांची लेक राहा आता लवकरच या आलिशान बंगल्यात शिफ्ट होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.