टेम्पो,कारला कंटेनरची धडक
esakal June 09, 2025 11:45 PM

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : वाहतूक नियमांकडे दुर्लक्षामुळे झालेल्या अपघातात अपघातग्रस्त कंटेनर टेम्पोसह कारवर आदळला होता. या घटनेत तिन्ही वाहनांचे नुकसान झाल्याने कोनगाव पोलिस ठाण्यात कंटेरनच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील पुलाजवळ रविवारी पहाटे साडेचार वाजता अपघात झाला होता. या अपघातात कंटेनरचालक रिंकूचे त्याच्या ताब्यातील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या टेम्पोसह एका कारला धडक दिली होती. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून, टेम्पोसह कारचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी टेम्पोचा चालक जियाउल अजीज अन्सारी (२८) याच्या फिर्यादीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात रिंकूविरोधात मोटार वाहन अधिनियम १८४ सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.