सांगली पालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक, लाच मागितल्याने कारवाई
Marathi June 10, 2025 08:25 AM

इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली मनपाचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.  विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पथकाने साबळे यांच्या घरावर छापा टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. या तक्रारीत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचेही नाव असल्याची चर्चा आहे.

तक्रारदारांच्या कंपनीमार्फत शहरातील एका परिसरात 24 मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता. बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी साबळे यांनी दहा लाखांची मागणी केली होती. तडजोडीनंतर सात लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर वैभव साबळे यांनी लाचेची रक्कम मात्र स्वीकारली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.