बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5' चे चौथ्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.
'5'च्या कमाईत घट झालेली पाहायला मिळाली आहे. चित्रपटाने पहिले तीन दिवस बंपर कलेक्शन केले आहे. मात्र 'हाऊसफुल 5' कलेक्शमध्ये अपयशी ठरला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 24 कोटी रुपयांची कमाई केली. तर वीकेंडला या चित्रपटाने सर्वांत जास्त कमाई करून 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'हाऊसफुल 5'ने शनिवारी 31 कोटी तर रविवारी 32 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता सोमवारच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. मात्र या आकड्यांनुसार रविवारच्या तुलनेत 'हाऊसफुल 5'च्या घसरण झाली आहे. 'हाऊसफुल 5'ने रिलीजच्या चौथा दिवशी सोमवारी 13.50 कोटी रुपयांचे कमाई केली आहे. यामुळे आतापर्यंत चार दिवसांत 'हाऊसफुल 5'ने तब्बल 101 कोटी रुपये कमावले आहे.
दिवस पहिला - 24 कोटी रुपये
दिवस दुसरा - 31 कोटी रुपये
तिसरा दिवस - 32 कोटी रुपये
चौथा दिवस - 13.50 कोटी रुपये
एकूण - 101 कोटी रुपये
भविष्यात हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असे बोले जात आहे. चित्रपट लवकरच आपले बजेट देखील वसूल करेल. 'हाऊसफुल 5' चित्रपट त्याच्या वेगवेगळ्या आणि धमाकेदार क्लायमॅक्समुळे चांगला चर्चेत आहे.
'हाऊसफुल 5' चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन यांची भन्नाट कॉमेडी पाहायला मिळत आहे. चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे.