- प्रा. डॉ. ज्ञानदेव निटवे
भारतात कॉमर्स हा लोकप्रिय प्रवाह आहे. कॉमर्स युगात आपल्याला कॉमर्स शास्त्र तारू शकेल. त्यासाठी वाणिज्य क्षेत्राचे वाढते महत्त्व कळणे गरजेचे आहे. नियोजनबद्ध अभ्यासाने आपण वाणिज्य शाखेच्या विविध क्षेत्रांत करिअर करून, महत्त्वपूर्ण पदव्यांचे मानकरी होऊ शकता. वाणिज्य क्षेत्रात खूप संधी आहेत, त्यापैकी काही मोजक्या संधी कोणत्या आहेत, त्याची थोडक्यात माहिती घेऊयात.
विविध कोर्सेस
बी.कॉम. + कंपनी सेक्रेटरी
हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे.
बी.कॉम. (Hons.)
हा तीन वर्षे पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे. बिझनेस मॅथेमॅटिक्स, मॅनेजमेंट फाउंडेशन, फायनान्शिअल अकाउंटिंग, मायक्रो इकॉनॉमिक्स, लॅग्वेज, इंडियन फायनान्शिअल सिस्टम आदी अभ्यासक्रम असतात.
बी.कॉम. इन फायनान्स अॅण्ड अकाउंट
हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. फायनान्शिअल अकाउंटिंग, बिझनेस मॅथेमॅटिक्स, बिझनेस इकॉनॉमिक प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, कॉम्प्युटर फंडामेंटल आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
बी.कॉम. इन बँकिंग मॅनेजमेंट
हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. बिझनेस कम्युनिकेशन, फायनान्शियल अकाउंटिंग, सॉफ्ट स्किल सब्जेक्ट आदी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
बी.कॉम. इन ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम (व्होशनल)
हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी शिक्षण असून, मार्केटिंग अॅण्ड सर्व्हिस मॅनेजमेंट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन अॅण्ड मानवी हक्क इंडियन फायनान्शिअल सिस्टीम आदी विषयाचा या अभ्यासक्रमात समावेश असतो.
कंपनी सेक्रेटरी
हा तीन वर्षांचा प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. दूरस्थ शिक्षणपद्धतीने पूर्ण करता येऊ शकतो.
कॉस्ट अॅण्ड वर्क अकाउंटंट (सीडब्ल्यूए)
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क अकाउंटंट ऑफ इंडिया या क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवते. तो फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल असा त्रिस्तरीय आहे. फाउंडेशन अभ्यासक्रम बारावी उत्तीर्ण विद्यार्थी करू शकतात. इंटरमिजिएट अभ्यासक्रमास कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.
चार्टर्ड फायनान्शियल अॅनॅलिस्ट
पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, इंटरनॅशनल फायनान्स अॅण्ड रिसर्च या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संबंधित उमेदवार आपले कौशल्य वापरू शकतात. माहिती तंत्रज्ञानाचे कौशल्य अवगत केल्यास संधी आणखी वाढू शकते. चार्टर्ड फायनान्शियल अॅनॅलिस्ट होण्यासाठी आयसीएफएआय (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अननिर्मित ऑफ इंडिया) या संस्थेचा त्रिस्तरीय अभ्यासक्रम करावा लागतो. हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन पद्धतीनेही करता येतो.
नोकरीच्या संधी
अकाउंटंट, फायनान्स कंट्रोलर, एक्झिक्युटिव्ह चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, फायनान्शियल ॲनालिस्ट, फायनान्स कंट्रोलर, फायनान्स मॅनेजर फायनान्स कन्सल्टंट, इन्व्हेस्टमेंट ऍनालिस्ट स्टॉप ब्रोकर, पोर्टफोलिओ मॅनेजर, टॅक्स ऑडिटर, टॅक्स कन्सल्टंट, क्रेडिट मॅनेजर, ज्युनिअर अकाउंटंट, इंटरनेट एक्झिक्युटिव्ह ई-कॉमर्स, कार्पोरेट लॉयर, बँका, केपीओ तसेच वाणिज्य क्षेत्रातील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसायसुद्धा करता येतो. कोणत्याही गोष्टी करीत असताना आपल्याकडे ‘अ’ आणि ‘ब’ किंवा त्यापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध करून ठेवावेत.