अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले
BBC Marathi June 12, 2025 09:45 PM
UGC

गुजरातमध्ये माहिती समोर येत आहे. हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानीनगर या रहिवाशी भागात कोसळलं आहे.

हे विमान चे Flight AI171 होते. उड्डाणावेळेस हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होते.

या विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती एएनआयनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.

अहमदाबाद झोन-4 चे डीसीपी कानन देसाई यांनी या परिसरात विमान अपघात झाल्याचे पीटीआयशी केलेल्या संवादात स्पष्ट केले आहे.

अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी पीटीआयला सांगितले की, "विमानतळाजवळील मेघानीनगर परिसरात एक विमान कोसळले आहे. ते कोणत्या प्रकारचे विमान होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही."

अग्निशमन अधिकारी म्हणाले, "विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या आहेत."

दुसरीकडे, एएनआयने नागरी उड्डाण महासंचालक (डीजीसीए) यांचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, "कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. तसेच सह-वैमानिकाला 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) नुसार, या विमानाने अहमदाबादहून पहाटे 1.39 वाजता उड्डाण केले. त्यांनी एटीसीला डिस्ट्रेस कॉल केला, परंतु त्यानंतर एटीसी कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. धावपट्टी 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर पडले. अपघातस्थळावरून काळा धूर निघताना दिसत होता."

गुजरातचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही अहमदाबादमधील विमान अपघाताच्या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि वर माहिती दिली आहे. ते लिहितात , "अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताच्या दुर्घटना घडल्यामुळे मला दुःख झाले आहे. मी अधिकाऱ्यांना अपघातात त्वरित मदत कार्य हाती घेण्याचे आणि जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर त्वरित उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत."

जखमींना तात्काळ मदत करण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनांबाबत त्यांनी पुढे लिहिले की, "जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्याच्या आणि रुग्णालयात सर्व उपचार व्यवस्था प्राधान्याने सुनिश्चित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत."

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लिहिले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांच्याशी बोलून या विमान अपघातात बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ पथके आणि केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य मिळण्याचे आश्वासन दिले आहे.

एअर इंडियाने काय म्हटले?

, " हे अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान AI171 होते आणि आम्ही सध्या अधिक तपशील मिळवत आहोत."

समोर येत असलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाला आग लागली आहे आणि धूरही निघताना दिसत आहे.

हवाई वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या फ्लाइट रडार 24 ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अॅक्सवर लिहिले की, "अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 क्रॅश झाल्याचे वृत्त आहे. टेकऑफ झाल्यानंतर काही सेकंदांनी आम्हाला शेवटचा सिग्नल मिळाला."

फ्लाइट रडार 24 नुसार, अपघातग्रस्त विमान 787-8 ड्रीमलायनर प्रकारचे होते.

एएनआयच्या वृत्तानुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्यांनी केंद्र सरकारला या संदर्भात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे. )

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.