छत्रपती संभाजीनगर :
संभाजीनगर जिल्ह्यातून जोरदार पावसाला सुरुवात
सलग दोन दिवस वादळी वाऱ्यानंतर आज जोरदार पावसाला सुरुवात
काल आणि परवा सलग दोन दिवस झाला होता हलका पाऊस
आज चांगला पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विमान अपघातानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.
- उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला सुरुवात
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग विभागाशी संबंधित प्रश्न आणि विषयांवर बैठक
- नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाबाबत देखील बैठकीत होणार चर्चा
- मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित
Air India Plane Crash Live Update: जोपर्यंत ब्लॅक बॉक्स सापडत नाही तोपर्यंत मी अचूक माहिती देऊ शकत नाही- अरिंदम दत्ताएक कार्यरत व्यावसायिक पायलट, अरिंदम दत्ता म्हणतात, "जोपर्यंत ब्लॅक बॉक्स सापडत नाही आणि त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला अचूक माहिती देऊ शकत नाही. आमच्या माहितीत असे आले की टेकऑफनंतरही लँडिंग गियर खाली होता; तो ५० ते ६० फूट वर असायला हवा होता आणि नंतर तो ३० ते ४० सेकंदात बुडाला. मोठ्या प्रमाणात इंधनासह, किमान ९०-१०० टन इंधन, म्हणजे विमानाचा पेट्रोल - तो निसर्गाने अत्यंत ज्वलनशील आहे आणि एका लहानशा ठिणगीने, तो बॉम्बसारखा होईल... सुरक्षा ऑडिट आम्हाला योग्य कारण देईल. दोन ते तीन कारणे असू शकतात: यांत्रिक, मानवी चूक किंवा हवामान. टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान, हे दोन्ही भाग खूप महत्वाचे आहेत. त्या ३० सेकंदात, कॅप्टनने मेडे कॉल दिला, म्हणून कॉकपिटमध्ये काहीतरी चालू होते आणि त्या काळात, त्याला कॉल करण्याची हिंमत होती..."
Air India Plane Crash Live Update: अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरूअहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरू आहे.
Air India Plane Crash Live Update: मोदींनी अहमदाबाद रुग्णालयात एआय-१७१ विमान अपघातातील एकमेव वाचलेल्या आणि इतर जखमींची घेतली भेटमोदींनी अहमदाबाद रुग्णालयात एआय-१७१ विमान अपघातातील एकमेव वाचलेल्या आणि इतर जखमींची भेट घेतली आहे.
Air India Plane Crash Live Update: अहमदाबादमध्ये जे घडले ते अत्यंत धक्कादायक आहे- एम.ए. बेबीएआय-१७१ विमान अपघाताबद्दल, सीपीआय(एम) चे सरचिटणीस एम.ए. बेबी म्हणतात, "अहमदाबादमध्ये जे घडले ते अत्यंत धक्कादायक आहे. सीपीआयएमच्या वतीने, मी शोकग्रस्त कुटुंबाप्रती माझे मनापासून संवेदना व्यक्त करतो. मी भारत सरकारला याची सखोल चौकशी करण्याची विनंती देखील करू इच्छितो..."
Live update: भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात स्वागत!रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त पुढाकारातून सुरु झालेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर' अंतर्गत ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’ आज पहाटे कोल्हापूर स्थानकावर दाखल झाली.
Live : इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या आयआरजीसी प्रमुखाचा मृत्यूइस्त्रायलच्या या हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे (आयआरजीसी) प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी हुसेन यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Live : इराण-इस्रायल तणावाचा परिणाम भारतातील विमानसेवेवर, दिल्ली विमानतळाचं वेळापत्रक कोलमडलंइराण-इस्रायल तणावामुळे इराण, इराकमधील हवाई क्षेत्र बंद झाल्याने दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणांचे वेळापत्रक बाधित झाले आहे. दिल्ली विमानतळाने प्रवाशांना आपल्या विमान कंपनीशी संपर्क साधण्याचे आणि अधिकृत माहितीसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Live : मोठे अपघात होऊनही सरकारच्या चेहऱ्यावर दुख: नाही; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीकामोठे अपघात होऊनही सरकारच्या चेहऱ्यावर दुख: नाही, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे. या अपघाताची जबाबादारी घ्यायला कुणीही तयार नाही, असंही ते म्हणाले.
Ahmedabad plane crash Live : अमित शहांनी केली घटनास्थळाची पाहणीकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमान अपघात स्थळाची पाहणी केली असून, मृतांचे डीएनए जुळविण्याच काम सुरु असल्याचे सांगितले.
Ahmedabad plane crash Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केली जखमींची विचारपूसपंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी शासकीय रुग्णालयात विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली.
Ahmedabad plane crash Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले असून आधी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. यानंतर विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तसेच आढावा बैठकही घेणार आहेत.
Ahmedabad plane crash Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमान दुर्घटनास्थळी जाणारपंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधील विमान अपघातस्थळाला भेट देणार असून या अपघातातून वाचलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमारची हॉस्पिटलमध्ये विचारपूस करणार आहेत