१० शेअरचे होणार १०० शेअर्स, कंपनी बोनससह स्टॉक स्प्लिट करणार, रेकॉर्ड तारीख सोमवारी
ET Marathi June 14, 2025 02:45 PM
मुंबई : बजाज समूहाची दिग्गज कंपनी बजाज फायनान्सचे शेअर्स सोमवार १६ जून २०२५ रोजी एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिटचा व्यवहार करतील. कंपनीने एप्रिलमध्ये ४:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स (Bajaj Finance bonus share)आणि १:२ च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट जाहीर केले होते. कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी १६ जून ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शुक्रवारी बीएसईमध्ये कंपनीचे शेअर्स ९३३४.१५ रुपयांवर बंद झाले.



प्रत्येक शेअरवर ४ बोनस शेअर्स

बजाज फायनान्स आपल्या भागधारकांनीा ४:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे. म्हणजेच कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक १ शेअरसाठी ४ बोनस शेअर्स वितरित करेल. कंपनीने यापूर्वी सप्टेंबर २०१६ मध्ये गुंतवणूकदारांना १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. यावेळी प्रत्येक १ शेअरसाठी १ बोनस शेअर दिला होता.





स्टॉक स्प्लिट

बजाज फायनान्स शेअर्सचि विभाजन म्हणजेच स्टॉक स्प्लिट (Bajaj Finance stock split ratio) १:२ च्या प्रमाणात करत आहे. याचा अर्थ एक शेअर्स दोन भागात विभागत आहे. कंपनीने यापूर्वी सप्टेंबर २०१६ मध्ये त्यांचे शेअर्स ५ भागांमध्ये विभागले होते. बजाज फायनान्सने १० रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स २ रुपये दर्शनी मूल्याचे ५ भागांमध्ये विभागले होते.



१० शेअर्स १०० शेअर्स होतील

एखाद्या व्यक्तीकडे सध्या बजाज फायनान्सचे १० शेअर्स असतील तर बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट (Bajaj Finance bonus share and stock split) नंतर त्यांची संख्या १०० पर्यंत पोहोचेल. शेअर्सची संख्या १०० पर्यंत कशी पोहोचेल हे अशा प्रकारे समजू शकतो. बजाज फायनान्स त्यांचे शेअर्स दोन भागात विभागत आहे. अशा परिस्थितीत, शेअर विभाजनानंतर १० शेअर्स वाढून २० होतील. कंपनी ४:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरित करत आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक शेअरवर ४ बोनस शेअर्स देईल. २० शेअर्सवर गुंतवणूकदाराला ८० बोनस शेअर्स मिळतील आणि अशा प्रकारे एकूण शेअर्सची संख्या १०० पर्यंत पोहोचेल.



© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.