भारत-पाकिस्तानमधील शीतयुद्धाबरोबर अमेरिकेतील ट्रम्प सरकारचे जागतिक धोरण, रशिया-युक्रेन आणि इराण-इस्त्राइल युद्धामुळे तणावाच्या परिस्थितीमुळे सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत. सोन्याच्या लाखांचा टप्पा ओलंडला असून, ही जागतिक अस्थिरतेमुळे त्यात अधिक वाढ होऊ शकते. प्रतितोळा म्हणजेच, दहा ग्रॅमला 98 हजार 340 रुपये भाव झाला असून, तो जीएसटीसह लाख रुपयांवर गेला आहे. अहिल्यानगरमध्ये सोन्याचे भाव 99 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम असून तो जीएसटीसह 1 लाख 2 हजार 485 रुपये होणार आहे. चांदीचा भाव एक लाख 7 हजार प्रति किलो असून, तो जीएसटीसह 1 लाख 13 हजार 425 रुपये असणार आहे, अशी माहिती IBJA उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सागर कायगांवकर यांनी दिली.
Nitin Gadkari : मालवाहतूक खर्चात सहा टक्क्यांची घट; मंत्री नितीन गडकरी यांचा दावादेशातील चांगल्या महामार्गामुळे मालवाहतुकीच्या खर्चात सहा टक्क्यांची घट झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. आयआयएम बेंगळुरू, आयआयटी कानपूर, आयआयटी चेन्नई संस्थांनी केलेल्या अभ्यासाचा संदर्भ देत मंत्री गडकरी यांनी हा दावा केला आहे.
Israel Iran war : इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका; जागतिक एअर ट्राफिक परिणाम, भारताची विमानसेवा कोलमडलीइराण-इस्त्रायलच्या युद्धाचा भडका उडाल्याने त्याचा परिणाम जागतिक पातळीवर जाणवू लागला आहे. एअर ट्राफिक यामुळे कोलमडली असून, भारताने या युद्धामुळे अनेक विमान उड्डाणं रद्द केली आहे. यात प्राथमिक माहितीनुसार 16-20 विमाने परत बोलवल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय थायलंडमध्ये एका एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले आहे.
Plane Crash : अहमदाबाद इथं अपघातग्रस्त झालेल्या विमानाचा ब्लॅग बाॅक्स सापडलाअहमदाबाद इथं अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमानाचा ब्लॅग बाॅक्स सापडला आहे. दोनपैकी एक ब्लॅग बाॅक्स सापडल्याने विमान अपघाताचं कारण समोर येणार आहे. दुसऱ्याचा शोध सुरू आहे. कॉकपिट वॉयस रिकॉर्डर देखील सापडला आहे. यामुळे अपघाताचे कारण कळणे सोपं होणार आहे.
Air India London Flight : एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अर्ध्या तासात पुन्हा मुंबईला परतलेएअर इंडियाची मुंबईहून लंडनला जाणारे विमान अर्धा रस्त्यातच माघारी फिरल्याचा प्रकार समोर आलं आहे. लंडनला जाणारे विमान पुन्हा मुंबईत परतल्याने पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. फ्लाइटरडार24 नुसार, एअर इंडियाचे विमान AI-129 ने आज सकाळीच मुंबईहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले होते. मात्र पुन्हा हे विमान मुंबईत परतले आहे. यामागचं कारण काय, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताचा तपास अमेरिका करणार Ahmedabad Plane Crashअहमदाबादकडून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे विमानाच्या अपघाताचा, तपास अमेरिकास्थित नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड करणार आहे. गुजरात अहमदाबाद इथं झालेला हा अपघात भीषण असून, यात विमानात 242 प्रवासी होते. हा अपघात कसा झाला, याचा तपास करून अमेरिका नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड भारताला मदत करणार आहे. या अपघातात ब्रिटनचे 53प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे आतापर्यंत समोर आलं आहे.