Morning Habits : सकाळी लवकर उठल्याने हे आजार राहतात दूर
Marathi June 11, 2025 03:25 PM

रोज रात्री सकाळी लवकर उठू असा निर्धार करून झोपणारे आपण अनेकजण पाहतो. पण, सकाळी लवकर उठणे काही होत नाही. उठण्यास उशिर झाल्याने सर्वच दिनचर्येला उशीर होतो. ज्यामुळे दिवसभर चिडचिड सूरू राहते. परिणामी, आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण मिळते. त्यामुळे घरातील मोठी मंडळी आपल्याला दररोज पहाटे लवकर उठण्याचा सल्ला देतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे. या सवयीमुळे तुमचा दिवस लवकर सुरू होतो आणि सर्व कामे वेळेत पूर्ण होतात. सकाळी लवकर उठण्याच्या सर्वात मोठा फायदा म्हणजे आजार दूर राहतात. आज आपण जाणून घेऊयात सकाळी लवकर उठल्याने कोणते आजार दूर राहतात.

हृदय निरोगी राहते –

तज्ज्ञांच्या मते, सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने हृदय निरोदी राहते. कारण जेव्हा तुम्ही लवकर उठून व्यायाम करता तेव्हा शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदयाची सर्व कार्ये सुरळीत होतात.

वजन नियंत्रणात राहते –

सकाळी लवकर उठल्याने व्यायाम करण्यासाठी आणि नाश्ता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तुम्ही जेव्हा दररोज सकाळचा नाश्ता आणि व्यायाम करता तेव्हा वजन वाढत नाही, ते नियंत्रणातच राहते.

मधुमेह

सकाळी लवकर उठल्याने चयापचय क्रिया गतिमान होते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. त्यामुळे सकाळी लवकर उठणे डायबिटीज रूग्णांसाठी फायदेशीर सवय आहे.

पचनसंस्था निरोगी राहते –

सकाळी लवकर उठण्याची सवय पचनसंस्था निरोगी ठेवते. कारण सकाळी लवकर उठल्याने शरीराचे सर्व अवयव सक्रिय होतात. यात सकाळी उठून पाणी पिणे, चालणे आणि वेळेवर शौच केल्याने बद्धकोष्ठता, गॅस, असिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे सकाळी लवकर उठावे.

ताणापासून मुक्ती –

सकाळी लवकर उठल्याने ताणतणाव आणि नैराश्यापासून आराम मिळतो. दिवसभराचा ताण सकाळी लवकर उठल्याने कमी होतो. याशिवाय सूर्याच्या किरणांमुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन आनंदी हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते.

 

 

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.