भिवंडी (वार्ताहर)ः साठेनगर येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विकास धोत्रेला १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिस उपायुक्त यांच्या आदेशाने ठाणे जिल्हा, ठाणे शहर पोलिस आयुक्तालय, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्हा क्षेत्रातून दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार केले होते. असे असताना विकास कोणत्याही परवानगीशिवाय ठाणे शहरात वावरत असल्याने नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.